quarantine1. 
पुणे

धक्कादायक : लंडनहून पुण्यात आलेल्यांना क्वारंटाइनसाठी मोजावे लागतायत पैसे

बाबा तारे

औंध (पुणे) : लॉकडाऊनमुळे लंडनमध्ये अडकलेल्या पुणे शहर व जिल्ह्यातील 65 जणांना विमानाने मुंबईत व तेथून बसने आणून महाळुंगे- बालेवाडी क्रीडा संकुलाजवळील एका हॉटेलमध्ये क्वारंटाइन करण्यात आले आहे. विमानतळावर पहाटे दीड वाजता विमानातून उतरल्याबरोबर त्यांची आरोग्य तपासणी करुन पुण्यात पाठवण्यात आले. 

लंडनहून मुंबई पर्यंतचा नऊ तासाचा प्रवास करुन आल्यानंतर मुंबई विमानतळावर पहाटे दीड ते आठ वाजेपर्यंत थांबावे लागले. त्यानंतर एसटी बसने पुण्यात येईपर्यंत दीड वाजला होता. लंडनच्या थंड वातावरणातून मुंबईच्या उष्ण वातावरणात आल्याने जीव कासावीस झाल्याचे एका प्रवाशाने सांगितले. तसेच आम्हाला जिल्हाधिकारी कार्यालयाकडे नेऊन तिथून आदेश मिळाल्यावर क्वारंटाइन करण्यात येणार असे सांगितले गेले.

परंतु, कसलीही कल्पना न देता अचानक महाळुंगे -बालेवाडी क्रिडा संकुलाजवळील हॉटेलमध्ये आम्हाला क्वारंटाइन करणार असल्याचे सांगितले व तेथे उतरवून घेतले. हॉटेल कोणते तेथिल खर्च किती याबद्दलही आम्हाला कसलीच माहिती न देता थेट हॉटेलमध्ये उतरवले गेले.

तेथे आल्यानंतर प्रत्येकाला एका खोलीत राहण्यासाठी काही हजार रुपये मोजावे लागतील असे सांगितले. परंतु, एकंदरीत मुंबई ते पुणे प्रवास हा त्रासदायकच ठरला. कारण कुणी काहीच माहिती देत नव्हते व नेमके कुठे क्वारंटाइन करणार याचीही कल्पना न दिल्याने आमची मोठी गैरसोय झाल्याचे प्रवाशाने सांगितले.


पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

तर सर्वांच्या आरोग्याची काळजी घेतली जाणे गरजेचे असल्याने हॉटेलमध्ये सशुल्क क्वारंटाइन करण्यात आल्याचे अधिक्षक अभियंता युवराज देशमुख यांनी सांगितले. तसेच ज्यांना इथे नको असेल अशांना पालिकेच्या इतर ठिकाणच्या क्वारंटाइन कोंद्रांचा पर्यायही खुला असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FASTag KYC Process : 'फास्टॅग' अपडेट करणं आता झालं अधिकच सोपं; जाणून घ्या कसं?

IND vs AUS 2nd T20I: मेलबर्नवर ६४८२ दिवसानंतर हरला भारत; लाजीरवाण्या पराभवानंतर सूर्यकुमार यादव वाचा काय म्हणतो

IND vs AUS 2nd T20I Live: ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय; अभिषेक शर्माची एकाकी झुंज व्यर्थ, भारताच्या अन्य फलंदाजांनी खाल्ली माती

Latest Marathi News Live Update : बोईसर एमआयडीसीत पुन्हा आग; रिस्पॉन्सिव्ह कंपनी जळून खाक, कामगारांमध्ये भीती

Telangana Revanth Reddy Cabinet: तेलंगणाच्या रेवंत रेड्डी सरकारचा मोठा निर्णय! भारतीय क्रिकेट संघाच्या माजी कर्णधारास केलं मंत्री

SCROLL FOR NEXT