Medha_Kulkarni 
पुणे

माजी आमदार मेधा कुलकर्णी धक्काबुक्की प्रकरणी तिघांना अटक; आणखी एकजण फरार!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : श्‍वानाला फिरायला घेऊन जाणाऱ्या वृद्ध नागरीकाबरोबर वाद घालणाऱ्या मद्यपी टोळक्‍याला माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी जाब विचारला. तेव्हा त्या टोळक्याने कुलकर्णी यांना धक्काबुक्की केली. या प्रकरणी कोथरुड पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. ही घटना शनिवारी (ता.७) सायंकाळी कोथरूडमधील सहजानंद सोसायटी परिसरात घडली होती. 

अमर सयाजी बनसोडे (वय 26 ), विनोद सुरेश गेंदे (वय 26 ), रोहिदास उर्फ तेजस राजेंद्र कांबळे (वय 19, तिघेही रा. गणंजय सोसायटी, कोथरूड) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. तसेच मिथुन हरगुडे याच्या विरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला असून तो पसार झाला आहे. याप्रकरणी एका 34 वर्षीय महिलेने फिर्याद दिली. त्यावरुन आरोपींविरुद्ध मारहाण, धमकावणे आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला एका खासगी कंपनीत मनुष्यबळ व्यवस्थापन विभागात अधिकारी आहे. त्यांचे सासरे शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता सहजानंद सोसायटीत त्यांच्या श्‍वानाला घेऊन फिरत होते. त्यावेळी तेथील मोकळ्या जागेत बनसोडे, गेंदे, कांबळे, हरगुडे हे दारु पित बसले होते. त्यांनी फिर्यादीच्या सासऱ्याला श्‍वानाला आमच्या अंगावर सोडतोस काय, असे म्हणत त्यांच्याशी वाद घातला.

त्यानंतर एकाने त्यांना काचेची बाटली व दगड मारला. त्यामुळे ते घाबरू सोसायटीत गेले. त्यानंतर फिर्यादी महिला, राहुल कोल्हे, विलास कोल्हे यांनी टोळक्‍याकडे विचारणा केली. त्यावेळी त्यांनी महिलेस धक्काबुक्की केली.

दरम्यान, तेथून जवळच राहणाऱ्या माजी आमदार कुलकर्णी या आरडाओरडा ऐकून बाहेर आल्या. कोल्हे आणि कुलकर्णी यांनी आरोपींना पकडून जाब विचारला. त्यावेळी झालेल्या झटापटीमध्ये कुलकर्णी यांच्या हाताच्या बोटांना गंभीर दुखापत झाली. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके करीत आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Sarpanch News : सरपंचांचे अधिकार संपले?, फडणवीस सरकारचा निर्णय; मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासकांना अधिकार

प्रौढ बेपत्ता झाल्यास आता अपहरणाचा गुन्हा, नवी मुंबईत पहिली कारवाई; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांची अंमलबजावणी

Leopard Attack Junnar : औषध फवारणीचा पंप ठरला ढाल; बिबट्याच्या हल्ल्यातून शेतकरी दाम्पत्य थोडक्यात बचावले

Marathi News Live Updates : मराठा आंदोलकांनी तहसीलदारांची खुर्ची जाळली

Thane: ९५ टक्के मिळूनही आवडतं कॉलेज नाही, नैराश्यात १७ वर्षीय विद्यार्थ्यानं जीवन संपवलं; घरच्यांना शेवटचा मेसेज पाठवत...

SCROLL FOR NEXT