pune contonment 
पुणे

पुण्यातील तीन कँटोन्मेंट बोर्ड ठरले अव्वल; संरक्षण मंत्री ‘अवॉर्ड फॉर एक्स्लन्स’ने गौरव

सकाळ डिजिटल टीम

पुणे - गेल्या वर्षभरापासून जगात कोरोनाने थैमान घातलं आहे. आता व्हायरसच्या नव्या प्रकाराने लोकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. दरम्यान, कोरोनाचा कहर सुरु असताना संकटकाळात जवळची माणसंही मदतीसाठी पुढे येत नव्हती. अशा वेळी कोरोना योद्ध्यांनी नागरिकांना मदतीचा हात दिला. आरोग्य, पोलिस आणि प्रशासनाने नागरिकांना सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी प्रयत्न केले. 

करोना संकटकाळात नागरिकांना वेळेत वैद्यकीय सोयीसुविधा उपलब्ध करून देणे, रुग्णांवर तातडीने उपचार करणे, परिसर स्वच्छ ठेवणे आणि सरकारच्या नियमांचे पालन करण्यास नागरिकांना प्रोत्साहित करणे या कामगिरीबद्दल पुणे, खडकी आणि देवळाली कँटोन्मेंट बोर्डाला  संरक्षण मंत्री ‘अॅवॉर्ड फॉर एक्स्लन्स’ने गौरविण्यात आले. 

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

दिल्लीत संरक्षण मंत्रालयाच्या संरक्षण मालमत्ता विभागातर्फे आयोजित ऑनलाइन कार्यक्रमात विभागाच्या महासंचालक दीपा बाजवा यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. पुणे कँटोन्मेंट बोर्डातर्फे मुख्य कार्यकारी अधिकारी अमितकुमार, खडकी कँटोन्मेंट बोर्डातर्फे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार यांनी हे पुरस्कार स्वीकारले. 

संरक्षण मालमत्ता विभागातर्फे दरवर्षी शिक्षण, आरोग्य, रुग्णालयीन कामकाजात सुधारणा, नोंदींचे व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन अशा विविध वर्गवारीत कँटोन्मेंट बोर्डांना पुरस्काराने गौरविण्यात येते. करोनाच्या संकटकाळात तिन्ही कँटोन्मेंट बोर्डांनी आरोग्याच्या आघाडीवर उल्लेखनीय काम केले आहे. परिणामी करोना मृत्यूचे प्रमाण नियंत्रणात असून, करोनामुक्तांचे प्रमाण वाढले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर काका पुतण्या सोबत! दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढणार, अजित पवार यांनीच केली घोषणा

Akola Municipal Election 2025 : संपर्क झाला, पण प्रतिसाद नाही; अकोल्यात काँग्रेस-वंचित समीकरण का अडलं?

सुरुंगाच्या स्‍फोटाने कातरखटाव हादरले; बाजार सुरू असतानाच धमाक्याने पळापळी, दोघे जखमी, घरांवर दगडी अन्..

Railway : पुणे-मनमाड लोहमार्ग होणार ‘भार’दस्त; नवीन रूळ तब्बल ५५ कोटी टन वजनाचा भार वाहणार

Murlidhar Mohol : पुण्यावर मोदी-फडणवीसांचे व्यक्तिगत लक्ष; पन्नास हजार कोटींच्या विकासकामांना गती

SCROLL FOR NEXT