Crime_Suicide 
पुणे

१७ वर्षीय मुलीसह तिघांची आत्महत्या; लोणी काळभोरमध्ये एकाच दिवशी तीन घटना

सकाळ वृत्तसेवा

उरुळी कांचन (पुणे) : लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीत रविवारी (ता. २७) दिवसभरात तीन वेगवेगळ्या घटनेत सतरा वर्षीय मुलीसह तीन जणांनी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. कदमवाकवस्ती, कोरेगाव मूळ आणि कुंजीरवाडी या तीन गावात एकाच दिवसात तीन आत्महत्या झाल्याचे उघड झाल्याने, लोणी काळभोर पोलिसांनीही हळहळ व्यक्त केली आहे. 

भावना जितन सोलंकी (वय १७, रा.घोरपडे वस्ती, कदमवाकवस्ती), अभिषेक आनंदा गायकवाड (वय १९, रा. कोरेगाव मूळ) आणि गुलाब विष्णू आंबेकर (वय ४८, रा.कुंजीरवाडी) ही आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत. दरम्यान वरील तीनही जणांनी नेमक्या कोणत्या कारणांसाठी आत्महत्या केल्या आहेत, याची कोणतीही माहिती मिळाली नसल्याचे लोणी काळभोरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सूरज बंडगर यांनी सांगितले.

लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्य़ा माहितीनुसार, भावना सोलंकी या मुलीचा काही दिवसांपूर्वी विवाह नुकताच ठरला होता. रविवारी हा सुट्टीचा दिवस असल्याने, भावना सोलंखी दिवसभर, तिच्या होणाऱ्या नवऱ्यांशी फोनवरुन बोलत होती. या दरम्यान चार वाजण्याच्या सुमारास आराम करण्याच्या नावाखाली भावना एका खोलीत गेली. खोलीतून बराच वेळ बाहेर येत नसल्याने, भावना आरामासाठी गेलेल्या खोलीचा दरवाजा उघडला असता, घराच्या छताला भावनाने ओढणीच्या साह्याने गळफास घेतल्याचे आढळून आले. नातेवाईकांनी भावनास पुढील उपचारासाठी लोणी काळभोर येथील खाजगी रुग्नालयात नेले असता, तेथील डॉक्टरांनी भावना उपचारापूर्वीच मयत झाल्याचे जाहीर केले.

दरम्यान, कुंजीरवाडी येथील घटनेत गुलाब आंबेकर या व्यक्तीने राहत्या घरात गळफास घेऊन, आत्महत्या केल्याचा प्रकार दुपारी साडेचार वाजनेच्या सुमारास उघडकीस आला. अविवाहीत असलेल्या गुलाब आंबेकर मागील काही वर्षापासून आजारी होते. तसेच त्यांना काही दिवसापूर्वीच पॅरालीसीसचा झटकाही येऊन गेला होता.

तर कोरेगाव मूळ येथील तिसऱ्या घटनेत अभिषेक गायकवाड या तरुणाने दुपारच्या वेळी घरी कोणी नसल्याची संधी साधून, राहत्या घरी दोरीच्या साह्याने गळफास घेतल्याचे उघडकीस आले आहे. लोणी काळभोर पोलिसांनी अभिषेक गायकवाड याच्या घराची झडती घेतली असता, कोणत्याही प्रकारची आक्षेपार्ह गोष्ट आढळून आलेली नाही. यामुळे वरील तिघांच्याही आत्महत्येची नेमकी कारणे समजलेली नाहीत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

Mumbai Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गाची दुरावस्था, शरद पवार गटाचा संताप; उच्च न्यायालयात धाव

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

SCROLL FOR NEXT