three danced naked in front of the woman On birthday and behave obscenely Pune 
पुणे

बर्थडे सेलिब्रेशनवेळी पुण्यात घडला विकृत प्रकार; महिलेसमोर विवस्त्र होऊन तिघांनी केला डान्स

सकाळवृत्तसेवा

पुणे : प्रत्येकाची आपापल्या मित्र-मैत्रीणी किंवा कुटुंबातील सदस्यांचा वाढदिवस साजरा करण्याची वेगवेगळी पद्धत असते. त्यातून एकमेकांविषयीचे प्रेम अधिक वृद्धींगत करणे ही एकमेव भावना असते. परंतु कोंढव्यात मित्राचा वाढदिवस तिघांनी चक्क नग्नावस्थेत नाच करीत साजरा केला, इतकेच नाही, तर त्या पार्टीत असलेल्या एका महिलेशी अश्‍लिल वर्तन करीत तिचा विनयभंगही केल्याचा धक्कादायक प्रकार उघडीस आला. अखेर पोलिसांनी त्यापैकी एकाला बेड्या ठोकल्या, तर अन्य दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. 

साळुंके विहारमधील एका सोसायटीमध्ये राहणाऱ्या राज उर्फ कैलाश महेश गणात्रा या व्यक्तीचा मागील महिन्यात वाढदिवस होता. त्याच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी त्याचे मित्र अमोल कंडई व सिद्धार्थ शेट्टी तसेच त्यांच्या ओळखीच्या 37 वर्षीय महिला आल्या होत्या. यावेळी घरामध्ये संगीत गाणे सुरू होते. त्यावेळी सगळेचजण गाण्याच्या तालावर थिरकू लागले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, हळूहळू पार्टी रंगत आली, त्यावेळी राज, अमोल व सिद्धार्थ या तिघांनीही आपल्या अंगावरील कपडे काढून टाकले. त्यानंतर तिघेजण नग्नावस्थेतच महिलेसमोर नाचू लागले. त्याहीपुढे जाऊन त्यांनी संबंधीत महिलेला स्वतःकडे ओढून तिच्या शरीराला स्पर्श करीत अश्‍लिल वर्तन करण्यास सुरूवात केली. यानंतर त्यांनी तिच्यावर जबरदस्ती करीत बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे घाबरलेल्या महिलेने त्यांना विरोध दर्शविला. त्यावेळी तिघांनी तिला जातीवाचक शिवीगाळ केली.

या प्रकारानंतर महिलेने तेथून कशीबशी स्वतःची सुटका करून घेतली. मात्र या प्रकाराचा महिलेला जबरदस्त धक्का बसला, त्यामुळे ती तब्बल एक महिना आजारी होती. या आजारातून सावरल्यानंतर तिने कोंढवा पोलिस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दाखल केली. त्यावरुन तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर राज गणात्रा यास पोलिसांनी अटक केली.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बिहार हादरलं! एकाच कुटुंबातील पाच जणांना जिवंत जाळलं; १६ वर्षांच्या मुलाने डोळ्यांनी बघितलं, धक्कादायक कारण?

Latest Maharashtra News Updates : ..तर हे स्पष्ट होईल, की महाराष्ट्राविषयीचा द्वेष हाच भाजपचा खरा चेहरा आहे! - उद्धव ठाकरे

Pune Crime: आषाढी वारीत मुलीवर अत्याचारप्रकरणी मोठी अपडेट, नराधमांना अटक; आरोपी निघाले...

Murud Crime : पोलिसांच्या मारहाणीत युवकाचा मृत्यू झाल्याचा संशय; नातेवाईकांनी रस्ता अडवला

Government Recruitment 2025: राज्यात मेगाभरती! मुख्यमंत्र्यांची घोषणा; भरती प्रक्रियेचे नियम बदलणार

SCROLL FOR NEXT