fire 
पुणे

अरे रे, शेतकऱ्याने कष्टाने पिकवलेला तीनशे पिशवी कांदा आगीत खाक

सावता नवले

कुरकुंभ (पुणे) : दौंड तालुक्यातील मळद येथील शेतकरी प्रदीप झुरूंगे यांच्या शेतातील कांदा साठवण चाळीच्या वरून गेलेल्या (वखार) वीज वितरण कंपनीच्या वीजवाहक तारांचे शॉर्टसर्किट होऊन बुधवारी (ता. 26) लागलेल्या आगीत तीनशे पिशवी कांदा जळून खाक झाला. नुकसानीचा पंचनामा करण्यात आला असून, वीज वितरण कंपनीने भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. 

मळद येथील प्रदीप झुरूंगे यांच्या गट क्रमांक 55 मधील शेतजमिनीत बांबू, लाकूड व ऊस पाचट याचा वापर करून कांदा साठवण चाळ (वखार) तयार करण्यात आली होती. त्यामध्ये तीनशे पिशवी कांदा साठून ठेवला होता. या कांदा चाळीवरून वीज वितरण कंपनीच्या वीजवाहक तारा गेल्या आहेत. बुधवारी (ता. 26) दुपारी अचानक विजेचे शॉर्टसर्किट झाल्याने कांदा चाळीला आग लागली. आगीत कांदा जळून खाक झाला. त्यामुळे संबंधित शेतकऱ्याचे दीड ते पावणे दोन लाखाचे नुकसान झाले. 

या नुकसानीचा गाव कामगार तलाठी यांनी पंचनामा करण्यात आला आहे. तसेच, पोलिसात वीज वितरण कंपनीविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. वीज वितरण कंपनीने नुकसान झालेल्या शेतकर्‍याला भरपाई देण्याची मागणी होत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Election : महायुती विरुद्ध महायुती सामना; कोल्हापूरच्या प्रभाग ९ मध्ये माजी नगरसेवकांची प्रतिष्ठेची लढत

Latest Marathi News Live Update : नाशिक पोलिस अकादमीमध्ये दीक्षान्त संचलन

BMC Election: मुंबईचं राजकारण हादरलं! उद्धव–राज ठाकरे युतीचा गुप्त फॉर्म्युला समोर, थेट संघर्ष होणार... महायुतीची तातडीची बैठक!

Shirdi News:'टी-२० विश्वकप विजेत्या अंध खेळाडू साईचरणी लीन'; जिंकून आणलेला चषक साई समाधीवर ठेवले!

चारित्र्याच्या संशयावरुन भयंकर शेवट; सॉफ्टवेअर इंजिनिअर पतीने बँकर पत्नीची गोळ्या झाडून केली हत्या, दोन मुलं असतानाही उचललं टोकाचं पाऊल

SCROLL FOR NEXT