corona1 
पुणे

मुबंईहून हवापालटासाठी आलेल्या जावयाने वाढवली सासरवाडीची चिंता 

जनार्दन दांडगे

लोणी काळभोर (पुणे) : मुबंईहून हवापालट करण्यासाठी हवेली तालुक्यातील लोणी काळभोर येथील राहिंजवस्ती परिसरात चार दिवसांपूर्वी आलेले जावई, त्यांची पत्नी व अडीच वर्षे वयाचा मुलगा, असे तीन जण कोरोनाबाधित असल्याचे मंगळवारी (ता. १४) सकाळी आढळून आले आहेत, अशी माहिती लोणी काळभोर प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. डि. जे. जाधव यांनी दिली. 

मुबंईहून एक तीस वर्षीय तरुण चार दिवसांपूर्वी पत्नी व आपल्या अडीच वर्षीच्या मुलासह लोणी काळभोर येथील सासुरवाडीत हवापालट करण्यासाठी आले होते. त्यांनी मुबंईमधून बाहेर पडण्यासाठी लागणाऱ्या पोलिस पाससाठी लोणी काळभोर हा पर्याय निवडला होता. मात्र, लोणी काळभोर हद्दीत मागिल काही दिवसांपासून कंटेन्मेंट झोन लागू असल्याने पोलिसाकडून त्यांचा पास रिजेक्ट झाला होता. यावर उपाय म्हणून त्याने लोणी काळभोरऐवजी सोरतापवाडीला जायचे, यावर क्लिक केले व पोलिसांनीही त्वरीत पास मंजूर झाला. मात्र, हीच गोष्ठ सोरतापवाडीकरांना भारी पडली आहे. एकाच दिवसात तीन कोरोना पॉझिटीव्ह आढळुन आल्याने प्रशासनाने सोरतापवाडी हद्दीत कंटेन्मेट झोन लागू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. 

याबाबत सोरतापवाडीचे सरपंच सुदर्शन चौधरी यांनी सांगितले की, मुबंईहून हवापालट करण्यासाठी चार दिवसांपूर्वी लोणी काळभोर येथे आलेल्या या तीन जणांनी केवळ पास मिळावा, यासाठी सोरतापवाडीचे नाव वापरले आहे. मुबंईहून आल्यापासून तीन जणांपैकी कोणीही सोरतापवाडी हद्दीत आलेले नाही. केवळ त्यांनी सोरतापवाडी पत्ता दाखवला. त्यावरून कंटेन्मेट झोन लागू करणे, ही बाब नागरिकांवर अन्याय करणारी आहे. सोरतापवाडी ग्रामपंचायत हद्दीत कंटेन्मेट झोन लागू करू नये, यासाठी हवेलीचे तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांच्याशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे.
 
Edited by : Nilesh Shende

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Eknath Shinde : वसंत डावखरे मानहानी प्रकरणाचा १७ वर्षांनी निकाल; उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंबाबत कल्याण न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

Cigarette Price Hike: सिगारेट पुन्हा महाग! तब्बल 51% वाढली किंमत; नवीन दर काय?

Uddhav Thackeray on Gyanesh Kumar : "ज्ञानेश कुमार पक्ष फोडणाऱ्या टोळीचे प्रमुख, त्यांनी लोकशाहीची हत्या केली", उद्धव ठाकरेंचा घणाघात

Marathi News Live Updates : SIR वादावर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण: सर्व निर्णय एकमताने घेतले

Kolhapur District Bank : जिल्हा बँकेच्या खिद्रापूर शाखेत ४० लाखांचा अपहार शिपायाचा कारनामा; शाखाधिकारी, लिपिकाचा यूजर वापरून काढले पैसे

SCROLL FOR NEXT