Crime_Murder 
पुणे

दोन वर्षांपूर्वीच्या भांडणाचा घेतला बदला; गॅरेजमध्ये एकट्याला गाठत केला खून

सकाळ वृत्तसेवा

पुणे : गुन्हेगारी गटातील तरुणांसमवेत दोन वर्षांपूर्वी केलेल्या मारहाणीच्या कारणावरुन तिघांनी सराईत गुन्हेगारावर तीक्ष्ण हत्याराने वार केले. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या गुन्हेगारावर उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. ही घटना पिसोळी येथे शनिवारी दुपारी साडे तीन वाजता ही घटना घडली. कोंढवा पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. 

सागर दादा औताडे (वय 23, रा. औताडेवाडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पुरुषोत्तम मंडावळे (वय 25, रा. उंड्री) याने कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी नारायण टुले याच्यासह त्याच्या दोन साथीदारांना ताब्यात घेतले आहे. 

सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक स्वराज पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर औताडे हा सराईत गुन्हेगार आहे. त्याची दोन वर्षापूर्वी विरुद्ध गुन्हेगारांच्या गटातील तरुणांसमवेत भांडणे झाली होती. तेव्हा सागरने त्यांना मारहाण केली होती. त्याचा राग गुन्हेगारांमध्ये होता. दरम्यान, सागर हा शनिवारी दुपारी साडे तीन वाजता त्याची दुचाकी घेऊन फिर्यादीच्या गॅरेजमध्ये दुरूस्ती करण्यासाठी आला होता. त्यावेळी तो एकटाच असल्याची संधी साधून पूर्वीच्या मारहाण प्रकरणातील तरुणांनी त्यास गॅरेजमध्ये गाठले. त्यांनी त्यांच्याकडे असणाऱ्या तीक्ष्ण हत्यारांनी सागरच्या शरीरावर आणि डोक्‍यात वार केले. या घटनेनंतर आरोपी तेथून पळून गेले.

स्थानिक नागरिकांनी या घटनेची माहिती कोंढवा पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिस आणि स्थानिक नागरिकांनी त्यास उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरू असतानाचा त्याचा मृत्यू झाला. या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन पोलिसांनी या प्रकरणातील तीन आरोपींना रविवारी सायंकाळपर्यंत ताब्यात घेतले. त्यांना अटक करण्याची प्रक्रिया रात्री उशीरापर्यंत सुरू होती.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

Machnur Siddheshwar Temple : माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरात प्रणिती शिंदेंकडून भाविकांची सेवा; ५ कोटी ४ लाखांच्या विकासकामांचा आढावा

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

SCROLL FOR NEXT