Police 
पुणे

अखिल मंडई मंदिर चोरी तपासाला वेग; पोलिसांची तीन पथके चोरट्याच्या मागावर

सकाळ वृत्तसेवा

पुणे : अखिल मंडई मंडळाच्या श्री शारदा गजानन गणपती मंदिरामधील दागिन्यांची चोरी करणाऱ्या चोरट्याच्या शोधासाठी विश्रामबाग पोलिसांची एक आणि गुन्हे शाखेची दोन अशी तीन पथके रवाना झाली आहेत. पोलिसांची वेगवेगळी पथके शहरासह अन्य ठिकाणीही चोरट्याचा माग काढत असून काही दिवसातच महत्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्‍यता पोलिसांनी वर्तविली आहे. 

गुरूवारी मध्यरात्रीच्या सुमारास मंदिरातील सभामंडपाकडे जाणाऱ्या मागील बाजुच्या दरवाजाचा कडी कोयंडा कटावणीच्या सहाय्याने उचकटून चोरट्याने मंदिरामध्ये प्रवेश केला. त्यानंतर चोरट्याने श्री शारदा गजाननाच्या मुर्तीवरील सुवर्णहार, कंठी, मंगळसुत्र अशी पंचवीस तोळ्यांचे सोन्याचे दागिने चोरुन नेले होते. मंदिराचे पुजारी शुक्रवारी सकाळी नित्यपुजेसाठी मंदिरात आल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला होता. या घटनेनंतर परिमंडळ एकच्या पोलिस उपायुक्त प्रियांका नारनवरे, विश्रामबाग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय टिकोळे यांच्यासह पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भेट दिली. त्यानंतर सीसीटीव्ही चित्रीकरण तपासून आरोपींचा माग काढण्यास सुरूवात केली होती. 

अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) अशोक मोराळे म्हणाले, "अखिल मंडई मंडळाच्या मंदिरात झालेल्या चोरीचा तपास गुन्हे शाखेच्या युनीट एकच्या पथकाकडून केला जात आहे. त्यांची दोन पथके चोरट्याचा शोध घेत असून काही दिवसातच धागेदोरे हाती लागतील.'' 

दरम्यान, विश्रामबाग पोलिसांकडून या घटनेचा तपास गांभीर्याने केला जात असून त्यासाठी पोलिसांचे एक पथक चोरट्याच्या मागावर आहे. काही दिवसात त्याविषयीचे काही धागेदोरे प्राप्त होण्याची शक्‍यता असल्याचे टिकोळे यांनी सांगितले. 

- पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे - क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Water Scarcity: पाणीटंचाईविरोधात जनआक्रोश! महाविकास आघाडीचा सिडको कार्यालयावर मोर्चा

Ajit Pawar : हजारो शेतकर्‍यांना कर्जमाफीने आर्थिक सुसह्यता मिळणार; माळेगावचा ऊस गळीत हंगाम शुभारंभ

FASTag KYC Process : 'फास्टॅग' अपडेट करणं आता झालं अधिकच सोपं; जाणून घ्या कसं?

Crime: मोकळ्या केसांना राख लाव अन्...; पतीच्या विचित्र कृत्याला पत्नीचा विरोध, रागाच्या भरात महिलेवर उकळती फिशकरी ओतली

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान मोदींची संजय राऊत यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना

SCROLL FOR NEXT