crime.jpg 
पुणे

आळंदीत रस्त्यावरच मुऴशी पॅटर्नचा थरार; पाहून बसेल धक्का!

विलास काटे

आळंदी : आळंदीतील डीवाय बॉईज नावाने उदयास येत असलेल्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरूणांनी हातात हत्यारे घेत 'मुळशी' पॅटर्न प्रमाणेच 'आळंदी' पॅटर्न हा गुन्हेगारी स्वरूपाचा  व्हिडीओ चित्रीकरण केला आणि शहरात खळबळ माजली.

शहरातील बसस्थानक, स्मशानभूमी, ग्रामिण रूग्णालय आणि भाजी मंडईसारख्या गर्दीच्या ठिकाणी स्वतःचाच व्हिडीओ काढून दहशत दाखविण्यासाठी सोशल मिडीयावर डीवाय बॉईज आळंदी पॅटर्न नावाने तो व्हायरल केला. हा व्हिडीओ पोलिसांकडे गेल्यावर पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल करून अटक केली असल्याची माहिती आळंदी पोलिसांनी दिली.

याप्रकरणी फिर्याद आळंदी पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक बाळासाहेब विष्णू खेडकर यांनी दिली. दरम्यान, या प्रकरणी गणेश बाळकृष्ण रंधवे (वय १८), अक्षय काळूराम हुंडारे (वय १८), ओमकार मिलिंद पाटोळे (वय १८), आकाश बाजीराव जाधव (वय १८), काशिवान तन्सिम अन्सारी (वय १८), अर्जून खिलारे (वय १८) या सहा जणांवर आळंदी पोलिस ठाण्यात इंडीयन आर्म अॅक्टनुसार गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

सर्व आरोपी आळंदी पालिका कार्यालय आणि आळंदी पोलिस चौकीच्या परिसरात राहणारे असल्याने आळंदी पॅटर्नची विशेष चर्चा झाली. सर्व आरोपींनी आळंदीतील गर्दीची ठिकाणे व्हीडीओ चित्रीकरणासाठी निवडली. यामध्ये बसस्थानक, स्मशानभूमी, ग्रामिण रूग्णालय आणि भाजीमंडई अशा गर्दीच्या ठिकाणी व्डिडीओ काढल्याने उपस्थितांनाही काही काळ काय झाले कळाले नाही.

एवढ्यावरच ही मुले थांबली नाहीत, तर त्यांनी केलेले चित्रीकरण सोशल मिडियावर आळंदी पॅटर्न नावाने अपलोड केले. डीवाय बॉईज ही गुन्हेगारी टोळी आता नव्याने उदयास येवू लागल्याची चर्चा परिसरात आहे. पोलिसांकडे व्हिडीओ आल्यावर आळंदी पोलिसांनी स्मशानभूमीजवळ यातील पाच जणांना आज दुपारी बाराच्या दरम्यान हत्यारांसह चित्रीकरण करताना ताब्यात घेतले.

यातील खंबोडा मंदिराजवळ राहणारा अर्जून खिलारे हा पळून गेला आणि नंतर पुन्हा त्यास अटक केली. चित्रीकरणासाठीची हत्यारे खिलारेनेच पुरविल्याची माहिती अटक केलेल्या बाकी आरोपींनी सांगितली. दरम्यान, यात आणखी काही आरोपींचा शोध पोलिस करत असल्याची माहिती आळंदी पोलिसांनी दिली.
दरम्यान सर्व आरोपी मध्यम वर्गातील आहेत. मात्र मुळशी पॅटर्न पाहून आळंदीतही आपण काही करून दहशत वाढवू या प्रवृत्तीनेच त्यांनी चित्रीकरण केले. मात्र मुळशी पॅटर्नच्या नादी लागून काढलेला आळंदी पॅटर्न त्यांच्या अंगलट आला आणि अटकेची कारवाईस सामोरे जावे लागले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FACT CHECK : इशान किशन, अभिषेक शर्मा यांचा SRH कडून IPL 2026 खेळण्यास नकार? काव्या मारनचा नोंदवला निषेध... जाणून घ्या सत्य

MS Dhoni त्याची आवडती ७ क्रमांकाची जर्सी सोडणार? फेसबूक पोस्टने खळबळ, रवींद्र जडेजाच्या जाण्याने नाराज असल्याची चर्चा

Gudi Padwa 2026 : गुढीपाडवा का साजरा केला जातो माहीत आहे? जाणून घ्या सणाचा इतिहास आणि महत्त्व

Latest Marathi News Live Update : ऑनलाइन शॉपिंग पडली महागात ! महिलेची 98000ची फसवणूक

"सगळा एडिटचा खेळ" करणसोबतच्या रिलेशनशिपच्या चर्चांवर प्राजक्ताने सोडलं मौन ; "आमच्या दोघांमध्ये.."

SCROLL FOR NEXT