pune co.jpg 
पुणे

पुणे जिल्ह्यात आज दिवसभरात तब्बल एवढे नवे कोरोना रुग्ण

गजेंद्र बडे

पुणे : पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागात मिळून पुणे जिल्ह्यातील दिवसभरातील नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येत कालच्या तुलनेत आज (ता.२८) ४२६ ने घट झाली आहे. यामध्ये पुणे शहरातील १ हजार १३३ जणांचा समावेश आहे. यामुळे पुणे जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्येने आज पाऊण लाखाचा आकडा पार केला आहे.

दरम्यान, आज दिवसभरात ५५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे जिल्ह्यातील एकूण मृत्यूंची संख्या आता १ हजार ७९२ झाली आहे. आज दिवसभरातील एकूण मृत्यूंमध्ये सर्वाधिक ३५ रुग्ण पुणे शहरातील आहेत.

आज पुणे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या ७५ हजार ४०० झाली आहे. पुणे शहरातील सर्वाधिक रुग्णांपाठोपाठ पिंपरी चिंचवडमध्येही पुणे शहराच्या बरोबरीनेच १ हजार १३० नवे रुग्ण आढळून आले आहेत. ही संख्या पुणे शहराच्या तुलनेत अवघ्या तीनने कमी आहे. 

जिल्हा परिषद क्षेत्रात २३३ आणि नगरपालिका व कॅंटोन्मेंट बोर्डात मिळून १२२ रुग्ण नोंदले गेले आहेत. काल (ता. २७) रात्री ९ वाजल्यापासून आज (ता. २८) रात्री नऊ वाजेपर्यंतची ही आकडेवारी आहे.

आज मृत्यू पावलेल्यांमध्ये शहरातील ३५ रुग्णांच्या पाठोपाठ  पिंपरी चिंचवडमधील १३,  जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील चार  आणि कॅंंटोन्मेंट बोर्डातील  तीन जणांचा समावेश आहे. दिवसभरात नगरपालिका क्षेत्रातील एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.

(Edited by : Sagar Diliprao Shelar)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT