shinde.jpg 
पुणे

वृत्तपत्र विक्री करणाऱ्या शिंदे ताई म्हणताहेत,  सांगा आम्ही जगावं तरी कसं?

सुषमा पाटील.

रामवाडी (पुणे) : पतीच्या निधनानंतर खचून न जाता मोठया जिद्दीने, चिकाटीने वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय गेली वीस वर्षांपासून सांभाळणाऱ्या छाया अशोक शिंदे या ताईंचे लाॅकडाउनमध्ये वृत्तपत्र विक्री व्यवसाय दिवसेंदिवस कमी झाल्याने त्यांचे अर्थिक नियोजन कोलमडलं आहे. ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता सोसायट्यांमध्ये घरोघरी वृत्तपत्र सकाळी पोहच केली. या पेपर विक्रीच्या पैशातून दोन मुलांचे शिक्षण पूर्ण केले, कर्ज फेडलं आल्या गेल्यांचा पाहुणचार केला पण सध्या कोरोनाच्या भीतीने अनेक सोसायटयांकडून पेपरवाल्यांना बंदी केल्याने माझ्या सह परिसरातील वृत्तपत्र विक्रेत्यांचा व्यवसाय कोलमडला आहे.

पेपरमुळे कोणताही धोका नसताना ही लोकांनी काही महिन्यापासून पेपर घेण्यास बंद केल्याने वृत्तपत्र विक्रेत्यांना दैनंदिन जीवन जगावं कसं हा प्रश्न निर्माण झाला आहे. सोसायट्यांनी पेपर टाकण्यास परवानगी द्यावी अशी मागणी वृत्तपत्र विक्रेते करीत आहे.
वडगावशेरी येथील रघुवीरनगर येथे राहणाऱ्या छाया अशोक शिंदे यांच्या पतीने 1985 साली वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय सुरु केला होता. परंतु, मिस्टरांच्या आजारपणामुळे 2000 सालापासून शिंदे ताईंनी हा व्यवसाय सुरु ठेवला आहे. सन 2007 साली पतीच्या निधनानंतर दोन लहान मुलांना मोठे केले. पदवीपर्यत शिक्षण दिले मुलीचे लग्न केले हे सर्व या पेपर विक्रीतून पण कोरोनामुळे व्यवसायाला फटका बसला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दररोज विविध वृत्तपत्रांचे 1300 पेपरची विक्री होत होती. ती आज दीडशेवर आली असल्याने दैनंदिन गरजा कशा पूर्ण करणार ही चिंता त्यांना  सतावत आहे. वृत्तपत्र टाकण्यास सोसायट्यांनी परवानगी द्यावी अशी मागणी हे व्यवसायिक करत आहे. शिंदे ताई म्हणाल्या, वीस वर्षापासून या व्यवसायात आहे. पेपरपासून कोरोना धोका नाही. तरीही अनेक सोसायट्यांमध्ये घरोघरी पेपर टाकण्यास बंदी केले. चाळीत पेपरला मागणी फार कमी आहे. चाळीत जे घेतात त्यांच्याकडे बिल मागण्यास गेल्यावर आमच्याकडे पैसे नाही दोन महिन्यांनी या असे सांगतात. तुम्ही सांगा आम्ही जगावं तरी कसं.


वृत्तपत्र विक्रेते रामचंद्र साठे मी 1970 सालापासून वृत्तपत्र विक्रेता आहे या कोरोना मुळे माझा व्यवसाय डगमगला आहे. सुरक्षित असणारा पेपर पण कोरोनाच्या भीतीने लोक घेईनात. त्यामुळे सर्व वृत्तपत्र विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 2nd Test: भारताला विजयाची संधी, पण पाऊस थांबणार कधी? शेवटच्या दिवशी खेळ झाला नाही तर काय, जाणून घ्या

'पुन्हा तोच बसस्टॉप' तेजश्री दिसणार जुन्या स्टॉपवर, फोटो शेअर करत म्हणाली, 'तेच ठाणे, तेच ठिकाण आणि तेच तुम्ही..'

Manmad News : मनमाड बाजार समितीच्या अडचणींवर मुख्यमंत्री फडणवीसांचा ‘सर्जिकल स्ट्राइक

Crime: मुंबईत धक्कादायक प्रकार! आधी गळा दाबून मारलं, नंतर ग्रॅनाइट मशीनने पत्नीचा शिरच्छेद अन्...; विक्षिप्त पतीचं कृत्य

'मला मराठी येत नाही, हिंमत असेल तर हकलून दाखवा' प्रसिद्ध अभिनेत्याचं ठाकरे बंधूंना चॅलेंज, म्हणाला, 'भाषेच्या नावावर हिंसा...'

SCROLL FOR NEXT