पुणे

दादांच्या आठवणींनी गहिवरली शेलारवाडी

CD

आंधळगाव, ता. ३० : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी वडगाव रासाई (ता. शिरूर) हद्दीतील शेलारवाडी येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी आठवणी जागवत असताना संपूर्ण सभा भावनांनी भारावून गेली.
शोकसभेत बोलताना माजी आमदार अशोक पवार यांनी अजितदादांच्या निर्णयक्षमतेचा प्रत्यय देणारा प्रसंग सांगितला. ‘‘वर्ष १९९१मध्ये सादलगाव येथे कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा उभारण्याचा निर्णय झाला होता. मात्र, काही राजकीय विरोधामुळे हे काम रखडण्याची चिन्हे दिसत होती. त्यावेळी स्व. रावसाहेब दादांसोबत मी अजितदादांकडे गेलो. परिस्थिती समजताच दादांनी संबंधित कुलकर्णी नावाच्या सचिवांना तत्काळ फोन करून, ‘कोणाचाही विरोध असला तरी हा बंधारा उभारायचाच आहे,’ असे ठाम आदेश दिले. त्यांच्या एका निर्णयामुळेच सादलगाव बंधाऱ्याचे काम तत्काळ सुरू झाले. सादलगावचा बंधारा पूर्ण झाल्यानंतर शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न कायमचा सुटला. समाजकल्याणाचा ध्यास,सर्वांना समान न्याय देण्याची भूमिका आणि विकासासाठी अखंड झटणारे अष्टपैलू नेतृत्व आज आपण गमावले आहे. ही हानी केवळ तालुक्याची नसून संपूर्ण राज्यासाठी अपूरणीय आहे.”
संभाजी फराटे म्हणाले, ‘‘वर्ष १९९८मध्ये मांडवगण येथे पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी अजितदादा पहाटे सहा वाजताच दाखल झाले. कार्यकर्तेही त्यांच्या वेळेच्या शिस्तीने अवाक झाले. पूरपाहणी दरम्यान होडीत पाणी शिरत असल्याचे लक्षात आल्यानंतर दादांनी तत्काळ गावासाठी नवीन व सुरक्षित होडी उपलब्ध करून दिली. संकटाच्या काळात तत्काळ निर्णय घेणारा नेता म्हणजे अजितदादा होते.”
कार्यक्रमादरम्यान अजितदादांच्या आठवणी सांगताना अनेक वक्ते भावुक झाले. दादांचे नेतृत्व, निर्णयक्षमता, संवेदनशीलता आणि ग्रामीण भागाशी असलेले अतूट नाते यामुळेच ते सर्वसामान्यांचे नेता ठरले, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली. याप्रसंगी माजी सभापती सुजाता पवार, घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष ऋषिराज पवार, रामचंद्र नागवडे, नरेंद्र माने, अशोक फराटे, किशोर फराटे, सुरेश पाचर्णे, सुरेश ढवळे, उमेश साठे, बाळासाहेब पवार आदी उपस्थित होते.

माजी आमदार रावसाहेब पवार यांच्या अंत्यविधीसाठी अजितदादा वडगाव रासाई येथे आले होते. त्यावेळी दादा स्मशानभूमीत वृत्तपत्र टाकून त्यावर शांतपणे बसले होते. पद, सत्ता यापलीकडे असलेला त्यांचा साधेपणा आम्ही त्या क्षणी अनुभवला.
- दत्तात्रेय फराटे, वडगाव रासाई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari : विमान अपघातावर मिटकरींचे गंभीर प्रश्न; सहा मृतदेहांपैकी एकाचा ठावठिकाणा अद्याप अज्ञात

Railway recruitment: रेल्वेमध्ये तब्बल २० हजारांहून अधिक 'ग्रुप डी' पदांसाठी भरती सुरू ; इयत्ता दहावी उत्तीर्ण उमेदवारही करू शकतात अर्ज

Pune Water News: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! ८ ते १० दिवस पाणीपुरवठा विस्कळीत होणार; पाणीटंचाईची भीती

Sangli Hit And Run : गणपती पेठेत ‘हिट अँड रन’चा थरार, चार पोलिसांसह अकरा जखमी; नशेतधुंद कार चालकास जमावाने तुडवले

Rohit Shetty House Firing Case : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबारप्रकरणी पुण्यातून पाचजण ताब्यात, गॅंगस्टर बिश्नोई टोळीशी संबंधाचा संशय

SCROLL FOR NEXT