पुणे

आळंदीत शुक्रवारपासून अतिक्रमण कारवाई

CD

कार्तिकी वारी तयारी लोगो करणे...

आळंदी, ता. ४ : कार्तिकी वारी काळात वारकऱ्यांना सुविधा देण्यासाठी नगर परिषद तर्फे तयारी सुरू आहे. शहरातील मंदिर परिसर, प्रदक्षिणा रस्ता, देहूफाटा परिसरामध्ये शुक्रवार (ता. ७) पासून अतिक्रमण कारवाई केली जाईल. पुणे-आळंदी रस्त्यासह इंद्रायणीवरील नवीन पुलावरील खड्डे सोमवार (ता. १०) पर्यंत बुजविले जाणार आहेत.
इंद्रायणी नदीमध्ये वारी काळामध्ये भाविकांना तीर्थ स्नानाची सोय व्हावी यासाठी आंध्रा जाधववाडी वडिवळे धरणातून ३०० क्यूसेस पाणी सोडण्यात येणार आहे. तसेच वारी काळात वारकऱ्यांना पाणीपुरवठा आणि आरोग्य बाबतच्या सुविधा तत्काळ पुरवणे शक्य व्हावे यासाठी आळंदी नगर परिषद कार्यालयामध्ये मध्यवर्ती नियंत्रण कक्ष स्थापन केला जाणार आहे. तसेच बांधकाम विभागाकडून पुणे-आळंदी रस्त्याचे काम डांबरीकरण केले जाईल .तसेच प्रदक्षिणामार्ग आणि इंद्रायणीवरील नव्या पुलावर खड्डे बुजविण्यात येणार आहेत. प्रदक्षिणा रस्ता देहू फाटा रस्ता तसेच चाकण, मरकळ, वडगाव रस्ता आणि महाद्वार भरावरस्ता, शनी मंदिर परिसर या ठिकाणी अतिक्रमण विरोधी पथकाद्वारे कारवाई केली जाईल, अशी माहिती नगर परिषदेचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी दिली.

पाणीपुरवठा व्यवस्था
वारी काळात २४ तास विभागवार पाणी बंद नळाद्वारे सोडले जाणार
भामा आसखेड धरणातून दररोज १० एमएलडी पाणीपुरवठा
जलशुद्धीकरण केंद्रामध्ये वीज खंडित झाल्यास पाणीपुरवठा अखंड राहण्यासाठी जनरेटरची सोय
१५ अतिरिक्त टँकरची ज्या भागात गरज आहे त्या ठिकाणी पुरवण्यासाठी सोय

स्वच्छतेवर भर
यावर्षी शहर स्वच्छतेची कामे रात्रीच्या वेळी होणार
स्वच्छतेसाठी सध्याचे ८० आणि अतिरिक्त २०० कर्मचारी
आळंदी नगर परिषदेच्या १४ , खेड, चाकण, पिंपरी-चिंचवड भागातील जादाच्या गाड्या कर्मचाऱ्यांसह येणार

दिव्यांची सोय
इंद्रायणीकाठी प्रखर प्रकाश झोताचे दिवे बसविणे सुरू
पदपथावरील दिव्यांची दुरुस्तीची सुरू

शौचालयाची सोय
सध्याची चार सुलभ शौचालय आणि १४ सार्वजनिक शौचालय मिळून ६०० सीटची व्यवस्था
८०० फिरते शौचालय शहराच्या बाहेर तसेच इंद्रायणीकाठी लावले जाणार

बचाव पथके
नदीपात्रातील बचावकामासाठी एनडीआरएफचे २ पथक
अग्निशमन यंत्रणा, भोजन व्यवस्था आणि स्वच्छता विभागाचे कर्मचारी दिवस-रात्र कार्यरत


सोयी-सुविधेची कमतरता नसणार
शहरातील रस्ते दुरुस्तीसाठी नुकतेच राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने एक कोटींचा निधी मंजूर केला आहे. पुणे-आळंदी रस्ता चकाचक होईल, अशी अपेक्षा नागरिकांना आहे. पाच कोटी रुपयांचा निधी इंद्रायणी घाटावर महाद्वारापर्यंत दगडी घाट करण्यासाठी राज्य सरकारने नुकतेच दिले आहेत. यात्रा निधी भरघोस असल्याने यंदाच्या वर्षी वारकऱ्यांना सोयी-सुविधा कोणतीही कमतरता होणार नाही, असे नगर परिषदेकडून सांगण्यात येत आहे.

06593

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

State Government : मंत्रिमंडळाचा निर्णयांचा धडाका; निवडणूक आचारसंहितेपूर्वी घेतले २१ निर्णय

Maharashtra Governance : कायद्याबाहेरील कलमांवर दिला हद्दपारीचा आदेश; विभागीय आयुक्तांनी उपजिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय केला रद्द!

Sakal Karandak : पुणे विभागातून ‘बीएमसीसी’ महाअंतिम फेरीत सकाळ करंडक; विभागीय अंतिम फेरीचा समारोप

PMC elections : महापालिका निवडणुकीच्या मतदार यादीच्या वेळापत्रकात बदल; ६ ऐवजी १४ नोव्हेंबरला प्रारुप मतदार यादी जाहीर होणार!

ODI Record: भारतीय वंशाच्या क्रिकेटरचा अमेरिकेसाठी पराक्रम; विराटलाही मागे टाकत वनडेमध्ये रचला विश्वविक्रम

SCROLL FOR NEXT