पारगाव, ता. २४ : अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील बुद्धिबळपटू अन्वी हिंगे हिने कॉमनवेल्थ बुद्धिबळ स्पर्धेत ८ वर्षांखालील मुलींच्या गटात रौप्यपदक जिंकत नेत्रदीपक कामगिरी केली. क्वालालंपूर (मलेशिया) येथे ८ ते १७ नोव्हेंबर दरम्यान झालेल्या या स्पर्धेत जगातील ३५ पेक्षा अधिक देशांतील खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
कॉमनवेल्थ चेस चॅम्पियनशिप ही आशिया, आफ्रिका, युरोप आणि ओशिनिया या राष्ट्रकुल देशांतील सर्वोत्तम युवा प्रतिभा एकत्र आणणारी प्रतिष्ठित स्पर्धा मानली जाते. अन्वीने या संपूर्ण स्पर्धेत सातत्य दाखवत ९ पैकी तब्बल ८ गुण मिळवले. शेवटच्या टप्प्यात विजेत्या इतकेच गुण मिळूनही टायब्रेकच्या फरकामुळे तिला रौप्यपदक मिळाले, परंतु गुणसंख्येनुसार ती ‘संयुक्त विजेती’ ठरली.
अन्वी ही चिंचवड येथील एलप्रो इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थिनी आहे. अन्वीने गेल्या काही महिन्यांत अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये यश मिळवले आहे. एप्रिलमध्ये तिने वर्ल्ड कॅडेट अॅण्ड यूथ रॅपिड चॅम्पियनशिप (रोड्स, ग्रीस) मध्ये व्हाईझ वर्ल्ड चॅम्पियन हा किताब पटकावला. त्यानंतर वेस्टर्न एशिया कॉन्टिनेंटल चेस चॅम्पियनशिप (ताजिकिस्तान) मध्ये तिने दोन सुवर्ण आणि चार रौप्य पदके जिंकत भारतासाठी सर्वाधिक पदके मिळवणाऱ्या खेळाडूंमध्ये स्थान मिळवले. या उल्लेखनीय कामगिरीमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे येथील कार्यक्रमामध्ये अन्वीचा विशेष सत्कार करत तिचे कौतुक केले होते.
सध्या अन्वी बँकॉक (थायलंड) येथे असून आगामी एशियन युथ चेस चॅम्पियनशिपची (२० ते ३० नोव्हेंबर) तयारी करित आहे, असे प्रशिक्षक प्रतीक मुळे यांनी सांगितले.
अन्वीची मेहनत, तिची चिकाटी आणि खेळातील समर्पण हीच तिच्या यशाची कारणे आहेत. तिच्या प्रत्येक आंतरराष्ट्रीय यशाने आम्ही भारावून जातो.
- दिपक हिंगे, अन्वीचे वडील
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.