पुणे

धामणीतील खंडोबाच्या यात्रेत पळाले नवसाचे १६० बैलगाडे

CD

पारगाव, ता. २ : धामणी (ता. आंबेगाव) येथील म्हाळसाकांत खंडोबा यात्रेनिमित्त आयोजित बैलगाडा शर्यतीमध्ये एकूण १६० बैलगाडे पळाले.
येथील यात्रेला काल रविवारपासून उत्साहात सुरुवात झाली. यात्रेला नवसाच्या बैलगाड्यांची शर्यती आयोजित केल्या जातात. विजेत्या बैलगाडा मालकांना कोणतेही बक्षीस दिले जात नसले तरी केवळ श्रद्धेपोटी शेकडो बैलगाडा मालक या शर्यतीमध्ये सहभागी होतात. धामणी परिसरातील नागरिकांच्या लोकवर्गणीतून शर्यतीसाठी सुसज्ज शर्यतीचा नवीन घाट बांधण्यात आला आहे.
बैलगाडा शर्यतीचे उद्‍घाटन पारगाव कारखाना पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नेताजी गंधारे, उद्योजक ज्ञानेश्वर विधाटे, विजय जाधव, शांताराम जाधव, विलास पगारिया, सरपंच अक्षय विधाटे, रामदास म्हातारबा जाधव, वामन जाधव यांच्या हस्ते झाले.
एकूण १६० बैलगाडा मालकांनी आपले बैलगाडे आणून सहभाग घेतला. शर्यतीची व्यवस्था माजी सरपंच सागर जाधव, शरद बाळासाहेब जाधव, दिलीप वाघ, संदीप रोडे, तुषार जाधव, आकाश जाधव, संजय जाधव, प्रतिक जाधव, रंगनाथ करंजखेले, शांताराम दत्तात्रय जाधव व धामणी, शिरदाळे, पहाडदरा व ज्ञानेश्वरवस्ती येथील ग्रामस्थांनी पहिली.

राहुल गांधींनी नरवणेंच्या पुस्तकाचा उल्लेख करताच सत्ताधाऱ्यांचा गोंधळ; शहा, राजनाथ सिंहसुद्धा आक्रमक

आम्ही टॉक्सिक नव्हतो पण... प्रियदर्शिनी इंदलकरने सांगितलं ब्रेकअपचं कारण; म्हणाली, 'तो वयाने मोठा असल्याने...'

Jal jeevan Yojana : जलजीवनचा 'कोरडा' थाट! बिले कंत्राटदाराच्या खिशात, पण जांभूळपाड्याच्या नळाला पाणीच नाही

Valentines Day Special Recipe: 'व्हॅलेनॉटाइन्स डे'ला तुमच्या जोडीदारासाठी बनवा खास चॉकलेट बिस्कीट केक, अगदी सोपी रेसिपी आहे!

Pune News: शेणापासून बनविलेल्या पर्यावरणपूरक कलात्मक वस्तू सातासमुद्रापार; मानसी व सायली निघोटबहिणींनी उभारला हक्काचा व्यवसाय!

SCROLL FOR NEXT