पुणे

जुन्नरमध्ये बसला लग्नसराईचा फटका

CD

जुन्नर, ता. ८ : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी जुन्नर तालुक्यात ६१.१८ टक्के मतदान झाले. जिल्हा परिषदेसाठी तालुक्यातील १५५८४६ पैकी ९९८५८ पुरुष तर १५१४०९ पैकी ८८१३८ महिला व एक अन्य असे एकूण ३०७२६० पैकी १८७९९७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. तालुक्यात बहुतांशी ठिकाणी मतदानासाठी निरुत्साह दिसून आला. तर लग्नसराईचा देखील मतदानाच्या टक्केवारीला फटका बसला असल्याची चर्चा होती.
तालुक्यात आठ जिल्हा परिषद व सोळा पंचायत समिती गणासाठी शनिवारी (ता. ७) मतदानाची प्रक्रिया पार पडली. तालुक्यात लक्षवेधी लढत म्हणून सर्वांचेच लक्ष लागलेल्या सावरगाव कुसूर गटात सर्वाधिक ७०.७३ टक्के मतदान झाले तर सर्वात कमी मतदान ५४.९६ टक्के एवढे नारायणगाव वारूळवाडी गटात झाले. तर पंचायत समितीच्या सोळा गणामध्ये ७०.९१ टक्के एवढे सर्वाधिक मतदान कुसूर तर सर्वांत कमी ५३.५५ टक्के एवढे मतदान नारायणगाव गणात झाले आहे. मतदान संपल्यानंतर मतदानाच्या आकडेवारीवरून जोरदार चर्चांना उधाण आले आहे. काही गटात वाढलेली आकडेवारी तर काही गटात मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवल्याने घटलेली आकडेवारी यावरून निकालाच्या शक्यता कार्यकर्त्यांकडून वर्तवल्या जात आहेत. गावागावांत प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून विजयाचा दावा केला जात असून जोरदार चर्चा रंगत आहेत. सोमवारी (ता. ९) होणाऱ्या मतमोजणीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

या दिग्गजांवर लक्ष
या निवडणुकीत अनेक मातब्बर उमेदवार व राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांचे राजकीय भवितव्य अवलंबून असणार आहे. सावरगाव-कुसूर या गटात सलग चार वेळा जिल्हा परिषद सदस्य राहिलेल्या आशा बुचके, माजी जिल्हा परिषद सदस्य गुलाब पारखे, तांबे बारव गटातून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे यांच्या सूनबाई मोनाली लांडे, नारायणगाव वारूळवाडी गटातून नारायणगावचे माजी सरपंच योगेश पाटे यांच्या पत्नी नेहा पाटे व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका प्रियांका शेळके, आळे पिंपळवंडी गटातून गतनिवडणुकीत अवघ्या एका मताने पराभव झालेले मंगेश काकडे, राजुरी बेल्हे गटातून माजी जिल्हा परिषद सदस्य स्नेहल शेळके, बोरी बुद्रुक खोडद गटातून शिवसेनेचे नेते ज्ञानेश्वर खंडागळे यांच्या पत्नी जयश्री खंडागळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष पांडुरंग पवार यांच्या सूनबाई कविता पवार या मातब्बर उमेदवारांचे राजकीय भवितव्य सोमवारच्या निकालात स्पष्ट होणार आहे.


गटनिहाय आकडेवारी
गट***एकूण मतदार***झालेले मतदान***टक्केवारी
डिंगोरे-उदापूर*** ३९०७१* २३०५६ * ५९.०१
धालेवाडी तर्फे हवेली -ओतूर***३७३७३* २१५६९* ५७.७१
आळे-पिंपळवंडी***४०६४३ **२२४५९**५५.२६
राजुरी-बेल्हे** ३८६५७ ***२५८१०**६६.७७
बोरी बुद्रुक-खोडद***३६०२२***२४२०१*** ६७.१८
नारायणगाव-वारूळवाडी ***३७१८५***२०४३७**५४.९६
सावरगाव-कुसूर**३६९१३* २६११०* ७०.७३
बारव-तांबे**४१३९६**२४३५५***५८.८३%

गणनिहाय आकडेवारी
डिंगोरे **१७९२५*१०४९०* ५८.५२
उदापूर***२११४६*१२५६६* ५९.४२
धालेवाडी तर्फे हवेली ***१८१२४*१०१२२* ५५.८५
ओतूर***१९२४९*११४४७* ५९.४७
आळे **१८०६२*९८२०* ५४.३७
पिंपळवंडी***२२५८१*१२६३९*५५.९७
राजुरी **१९८२३* १३५३७* ६८.२९
बेल्हे**१८८३४**१२२७३**६५.१६
बोरी बुद्रुक**१७३१६* ११९५१* ६९.०२
खोडद**१८७०६*१२२५०* ६५.४९
नारायणगाव *१९८०६*१०६०६* ५३.५५
वारूळवाडी *१७३७९*९८३१* ५६.५७
सावरगाव१७६१८*१२४२७* ७०.५४
कुसूर*१९२९५* १३६८३* ७०.९१

बारव *२०६८३*१२२८७* ५९.४१
तांबे*२०७१३*१२०६८* ५८.२६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zilla Parishad Panchayat Samiti Election result Live Update: जिल्हा पंचायत निवडणुकीत महायुतीचा मोठा विजय

Parbhani ZP Election: परभणी जिल्हा परिषदेत कोणी मारली बाजी? पाहा आतापर्यंत विजयी झालेल्या उमेदवारांची यादी

Satara ZP Election Winner List 2026 : सातारा जिल्हा परिषद निवडणूक निकाल; वाचा कोण जिंकले? कोण हरले? पाहा विजयी उमेदवारांची यादी

Sharad Pawar: शरद पवार यांची प्रकृती खालावली; पुण्यातल्या रुबी हॉल रुग्णालयात उपचार घेणार

Kolhapur Zilla Parishad election result : मुलगा, सून यानंतर पीए अशोकराव माने यांना धक्क्यावर धक्के! रूई जिल्हा परिषदेत माजी आमदार पुत्र राहुल आवळे विजयी

SCROLL FOR NEXT