पुणे

भाविकांकडून दुकानदाराला जेजुरीत काठ्यांनी मारहाण

CD

जेजुरी, ता. २ : जेजुरीत दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी नंदी चौकातील महादेव श्रीरंग वाघमारे (वय ३५) या भंडारा-खोबरे विकणाऱ्या दुकानदाराला चप्पल काढण्याच्या कारणावरून भाविकांनी दुकानात शिरून काठ्यांनी बेदम मारहाण केली. दुकानाचे मोठे नुकसान केले.

शनिवारी व रविवारी खंडोबा दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते. जेजुरी शहरातील नदी चौक येथे अज्ञात पाच ते सहा जणांनी ‘दुकानासमोर पायातील चप्पल काढू नका’, असे दुकानदाराने म्हणाल्याच्या कारणावरून शिवीगाळ करीत मारहाण केली. या पाच ते सहा जणांनी तेथे आजूबाजूला पडलेले लाकडी बांबू हातात घेऊन दुकानात शिरून मारहाण केली. दुकानाची तोडफोड करण्यात आली. भंडारा-खोबऱ्याचे भरलेले भांडे, पेढ्याचे पदार्थ पायाने हाताने फेकून देवून नुकसान केले. दुकानात शिरून फिर्यादी व इतरांना लाकडी बांबूने जोरजोरात मारहाण केली. फिर्यादी महादेव वाघमारे हे जखमी झाले आहेत. लाकडी दांडक्याने दार तोडण्याचा प्रयत्न केला. दार न तुटल्याने आत लपून बसलेले कामदार बचावले. महादेव श्रीरंग वाघमारे यांनी फिर्याद दिली आहे. पाच ते सहा अज्ञात भाविकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane Crime: गायमुखजवळ 'तो' येणारेय... पोलिसांना गुप्त माहिती मिळाली, सापळा रचला अन्... ठाण्यात नेमकं काय घडलं?

High Risk Alert : सावधान! ‘Firefox’ अन् ‘Thunderbird’ युजर्सना सायबर हल्ल्यांचा धोका

Latest Marathi News Live Update: शर्मिला बाबर भाजपाच्या उप महापौर पदाच्या उमेदवार

कुठूनच काहीत दिसत नसतं तरीही... साडीमधल्या बोल्ड लूकवर ऐश्वर्या नारकर यांचं उत्तर; म्हणाल्या, 'रिव्हिलिंग असं काही केलेलं नाही...'

February 2026 Festival List: यंदा फेब्रुवारीत महाशिवरात्रीसह साजरे होतील 7 खास सण

SCROLL FOR NEXT