पुणे

उजनीतील पाणी इंदापूरसाठी द्यावे

CD

पळसदेव, ता. १८ : इंदापूर तालुक्यातील खडकवासला कालव्याचा शेती सिंचनाचा व नीरा डावा कालव्यावरील बावीस गावांचा पाणी प्रश्‍न सोडविण्यासाठी उजनी अथवा मुळशी धरणाचे पाणी वापरता येणे शक्य आहे. याअनुषंगाने उजनी धरणाच्या पाण्याचे आॅडीट करणे गरजेचे आहे. यातून पाण्याचे फेरवाटप करून इंदापूरकरांसाठी ५ टीएमसी पाणी राखीव करण्याची गरज आहे. उजनीतील पाणी इंदापूरकरांचे हक्काचे पाणी आहे. त्यामुळे उजनी धरणातील पाणी खडकवासला कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करावे, ही मागणी घेऊन शेतकऱ्यांसमवेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे भाजप किसान मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष रमेश खारतोडे यांनी सांगितले.
ते म्हणाले, खडकवासला धरण साखळीतील पाणी पुणे व पिंपरी-चिंचवड महानगर पालिका मंजूर कोट्यापेक्षा जास्तीचे प्रमाणात वापरत आहेत. हेच पाणी सांडपाणी रूपाने वर्षभर भीमा नदीद्वारे उजनीत येत असते. उजनीचे पाणी वाटप झालेले आहे. यामध्ये पावसाळ्यानंतर नदीत पाणी सोडण्याची तरतूद नसतानाही दरवर्षी नदीतून पाणी सोडण्यात येते. यंदाही गेल्या पंधरवड्यात सुमारे १० टीएमसी पाणी उजनीतून नदीद्वारे सोलापूरसाठी देण्यात आले. यावर तालुक्यातील लोकप्रतिनिधी मूग गिळून गप्प राहतात. मात्र, इंदापूरकरांच्या शेतीसिंचनासाठी उजनीवरून पाणी उपसा योजना राबविण्यास सोलापुरात विरोध होतो. सध्या नीरा-भीमा स्थिरिकरण योजनेचे काम पूर्णत्वास जाण्याच्या मार्गावर आहे. नीरा नदीचे पाणी मराठवाड्याला नेण्याचे नियोजन आहे. परंतु इंदापूरकरांसाठी हेच पाणी वापरता येणे शक्य आहे. याशिवाय मुळशी धरणाचे पाणी विजनिर्मितीनंतर थेट समुद्राला जाऊन मिळते. हेच पाणी खडकवासला धरणसाखळीकडे वळविणे शक्य आहे. या सर्व शक्यता लक्षात घेऊन इंदापुरातील खडकवासला कालवा, नीरा डावा कालव्यावरील बावीस गावांचा पाणी प्रश्न सोडविणे शक्य होईल. वास्तविक जिल्ह्यातील पाणी इंदापूरच्या सिंचनव्यवस्थेसाठी प्राधान्याने देण्याचे नियोजन होणे गरजेचे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT