पुणे

यात्रा काळात गजबजलेली गावं यात्रा संपताच ओस

CD

कोळवण, ता. २ ः सध्या तालुक्यातील विविध गावांतील ग्रामदेवतांच्या वार्षिक यात्रा सुरू आहेत. त्यानिमित्ताने गाव सोडून पुणे, मुंबई येथे कामधंदा, नोकरी व मुलांच्या शिक्षणासाठी बाहेर गेलेले तरुण, तरुणी पुन्हा यात्रा काळात गावातील घरी येतात. यात्रा काळातील त्या मोजक्याच दोन-चार दिवसात गावं गजबजलेली असतात. बंद घरात माणसांचा राबता असतो, ज्या घरात फक्त वृद्ध आई वडील असतील त्या घरातही त्यांची मुलं, सुना, नातवंडे असं गोकुळा सारखं भरलेलं घर दिसतं.
यात्रोत्सव काळात सर्व गावातील घरात माणसांचा भरणा दिसतो. पाहुणे मंडळींनी व मित्र मंडळ यांनी घर व अंगण फुललेले दिसते. जेवणावळी उठतात. सर्व ठिकाणी आनंदी आनंद दिसतो. परंतु एकदा का यात्रा उत्सव यांची सांगता झाली की मग पुन्हा गावाकडे आलेले चाकरमानी आपल्या कामावर व्यवसायावर रुजू होण्यासाठी शहराकडे निघतात. मुलांच्याही शाळा असतात यासाठी नाइलाजाने का होइना गावं सोडावी लागतात. मग पुन्हा गावखेडी ओस पडतात. काही घरांमध्ये वृद्ध आई वडील तर काही घरं कुलूपबंद होतात.
गावातील आळ्यांमध्ये हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच लोक राहिले आहेत हे आजच्या घडीचे वास्तव आहे.
यात्रा काळात गजबजलेला गाव पुन्हा रिकामा दिसू लागतोय दिवसेंदिवस हे स्थलांतर वाढतच आहे.

पुण्यात स्नेहमेळावे
आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहे. प्रचार करण्यासाठी येणाऱ्या उमेदवारांना गावातील बंद घरं व बोटांवर मोजण्याइतकेच मतदार घरी सापडतात. यावर उपाय म्हणून उमेदवार शहरातील स्थलांतरित मतदारांचे स्नेह मेळावे पुण्यातील विविध भागात घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधींनी नरवणेंच्या पुस्तकाचा उल्लेख करताच सत्ताधाऱ्यांचा गोंधळ; शहा, राजनाथ सिंहसुद्धा आक्रमक

आम्ही टॉक्सिक नव्हतो पण... प्रियदर्शिनी इंदलकरने सांगितलं ब्रेकअपचं कारण; म्हणाली, 'तो वयाने मोठा असल्याने...'

Jal jeevan Yojana : जलजीवनचा 'कोरडा' थाट! बिले कंत्राटदाराच्या खिशात, पण जांभूळपाड्याच्या नळाला पाणीच नाही

Valentines Day Special Recipe: 'व्हॅलेनॉटाइन्स डे'ला तुमच्या जोडीदारासाठी बनवा खास चॉकलेट बिस्कीट केक, अगदी सोपी रेसिपी आहे!

Pune News: शेणापासून बनविलेल्या पर्यावरणपूरक कलात्मक वस्तू सातासमुद्रापार; मानसी व सायली निघोटबहिणींनी उभारला हक्काचा व्यवसाय!

SCROLL FOR NEXT