पुणे

मुखईतील घरफोडीप्रकरणी दोन सराईत आरोपींना अटक

CD

शिक्रापूर, ता. १६ : मुखई (ता. शिरूर) येथील संपूर्ण कुटुंब लग्नासाठी बाहेरगावी गेल्याची संधी साधून घराचे कुलूप तोडून तब्बल वीस तोळे सोन्याच्या दागिन्यांसह चांदीचे दागिने व रोकड चोरी करणाऱ्या दोन परप्रांतीय सराईत चोरट्यांना शिक्रापूर पोलिसांनी नुकतेच पकडले.
याबाबत शिक्रापूर पोलिसांनी माहिती दिली की, मुखई येथील मंगल रामचंद्र आरळेकर (वय ६६) या काही दिवसांपूर्वी आपल्या संपूर्ण कुटुंबियांसह एका लग्नासाठी बाहेरगावी गेलेल्या असताना चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलूप व किचनच्या खिडकीचे गज तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाटातून चोरट्यांनी वीस तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, काही चांदीचे दागिने, रोख पन्नास हजार रुपये व एक टिव्ही संच चोरुन नेला. याबाबत मंगल आरळेकर यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करुन तपासही तत्काळ सुरु केला. या गुन्ह्यातील काही सराईत आरोपींची माहिती शिक्रापूर पोलिसांना सीसीटीव्हीच्या माध्यमातून मिळाली. पोलिसांनी संशयित आरोपींचा शोध सुरू केला व त्यातील एक संशयित कपिल राजपूत हा तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर), तर वेद राजपूत हा आपटी (ता. शिरूर) परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे, पोलीस हवालदार श्रीमंत होनमाने, विकास पाटील, रोहिदास पारखे, अमोल दांडगे, राम जाधव, जयराज देवकर, अमोल नलगे, स्थानिक गुन्हे शाखेचे सागर धुमाळ यांनी तळेगाव ढमढेरे येथे जाऊन कपिल मनोरीया राजपूत (वय २६, सध्या रा. वाजेवाडी, ता. शिरूर) व आपटी येथील नदी काठाहून वेद संजीत राजपूत (वय २५, रा. पाथरगाव कामशेत, ता. मावळ) या दोघांना मोठ्या शिताफीने पकडले. चौकशी केली असता दोघांनीही त्यांच्या तीन साथीदारांच्या मदतीने आरळेकर यांच्या इथे चोरी केल्याची कबुली दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजय मस्कर करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari : विमान अपघातावर मिटकरींचे गंभीर प्रश्न; सहा मृतदेहांपैकी एकाचा ठावठिकाणा अद्याप अज्ञात

Railway recruitment: रेल्वेमध्ये तब्बल २० हजारांहून अधिक 'ग्रुप डी' पदांसाठी भरती सुरू ; इयत्ता दहावी उत्तीर्ण उमेदवारही करू शकतात अर्ज

Pune Water News: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! ८ ते १० दिवस पाणीपुरवठा विस्कळीत होणार; पाणीटंचाईची भीती

Sangli Hit And Run : गणपती पेठेत ‘हिट अँड रन’चा थरार, चार पोलिसांसह अकरा जखमी; नशेतधुंद कार चालकास जमावाने तुडवले

Rohit Shetty House Firing Case : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबारप्रकरणी पुण्यातून पाचजण ताब्यात, गॅंगस्टर बिश्नोई टोळीशी संबंधाचा संशय

SCROLL FOR NEXT