पुणे

आंतरपिकातून साधला अधिक उत्पन्न मिळवण्याचा ‘संगम’

CD

खुटबाव, ता. १० : संगम (ता.दौंड) येथील संजय बाळासाहेब थोरात यांनी दोन एकर शेतीमध्ये आले पिकासोबत यशस्वी आंतरपिकाचे उत्पादन घेतले आहे. आले पिकातून त्यांना चार लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे. आंतरपिकातून अधिक उत्पन्न मिळविण्याची किमया थोरात कुटुंबीयांनी साधली आहे.

बाजारभाव टिकून राहिल्यास किंवा आले संग्रहित केले तरी एकूण १० लाख रुपयांचे उत्पन्न मिळण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. याशिवाय मिरची व कलिंगड या आंतरपिकातून आले पिकाचा उत्पादन खर्च भागविला जात आहे.
दौंड तालुक्यातील सर्वाधिक सुपीक जमीन म्हणून संगम परिसर पाहिला जातो. या ठिकाणी थोरात यांची स्वतःच्या मालकीची ४० एकर शेतजमीन आहे. गेले अनेक दिवसांपासून उसाबरोबर, कांदा, पेरू, बाजरी व आल्याचे पीक थोरात घेत आहेत. थोरात यांनी सातारा येथून एका खासगी शेतकऱ्याकडून आल्याचे बी आणले. त्यांनी १६ जून २०२४ रोजी आल्याची लागण केली. त्यानंतर बुरशीनाशके व औषधांची फवारणी केली. रासायनिक खत टाकले. पहिले आंतरपीक मिरचीचे घेतले, मिरचीला सरासरी ४० ते ५० रुपये प्रतिकिलो बाजारभाव मिळाल्याने या आंतरपिकातून अडीच लाख रुपये नफा मिळाला. मिरची पिकानंतर मे महिन्यामध्ये कलिंगडाचे आंतरपीक लावले.

सरासरी चांगली उत्पन्न मिळाल्याने समाधान
यंदा मे महिन्यामध्ये अवकाळी पाऊस झाल्याने जेमतेम कलिंगडाचा उत्पादन खर्चच निघाला. जूनपासून आले पिकाने फुटवा धरला. त्यानंतर आले परिपक्व होण्यास सुरुवात झाली. गेली पंधरा दिवसापासून मंजूर व ट्रॅक्टरच्या सहाय्याने आले पिकाची काढणी सुरू आहे. सरासरी चांगली उत्पन्न मिळाल्याने थोरात परिवाराने समाधान व्यक्त केले आहे.

अशी केली शेताची मशागत
- उसाचे पीक घेतल्यानंतर शेतीला रोटर मारला.
- त्यानंतर आडवे उभे कल्टीवेटर मारले
- शेतीला २० ट्रेलर शेणखत टाकले.
- काकरणी करून शेणखत मातीमध्ये मिसळले
- साडेचार फुटी सरी काढली
- ठिबक सिंचनचे पाइप अंथरले
- चारही बाजूने अर्धा फूट अंतरावर आल्याचे रोपण केले.


वडील दिवंगत किसनराव थोरात व बंधू बाळासाहेब थोरात यांच्याकडून शेती शिकलो. गेल्या १० वर्षांपासून पत्नी सुनीता व अपत्यांनी आधुनिक शेती करण्यास सुरुवात केली. शेती हा आमच्या परिवाराचा मुख्य व्यवसाय आहे. शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करण्यास आनंद वाटतो.
- संजय थोरात (शेतकरी)

ताळेबंद आले पिकाचा
बियाणे खरेदी..............२,२०,०००
ठिबक व बेसल डोस..............८०,०००
खते व औषधे..............१,२०,०००
मजुरी..............३०,०००
एकूण खर्च..............३ लाख ५० हजार रुपये

03054

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zilla Parishad Panchayat Samiti Election result Live Update: लातूर जिल्हा परिषद निकालांचा थरार, काँग्रेस-भाजपमध्ये काट्याची लढत!

Zilla Parishad Election Result: संभाजी नगरमध्ये पुन्हा एमआयएमची चमक; जिल्हा परिषदेत कुणाला किती जागा मिळाल्या?

Satej Patil Kolhapur : कंप्लीट धुरळा! राज्यातील पहिली सर्वात तरूण उमेदवार कोल्हापूरमधून काँग्रेसच्या सोनाली पाटील विजयी, गगनबावड्यात सतेज पाटलांनी गड राखला

Dharashiv ZP Election Result : एका मताचे महत्त्व ! ढोकीमध्ये ठाकरे सेनेच्या अमर समुद्रेंचा अवघ्या १ मताने विजय, भाजपच्या उमेदवाराचा निसटता पराभव

Patan ZP Election Result : पाटणच्या राजकारणात मोठा उलटफेर; पाटणकरांचा बालेकिल्ला ढासळला, शंभूराज देसाईंचे 'निर्भेळ' यश

SCROLL FOR NEXT