पुणे

अवसरी खुर्द येथील महाविद्यालयात मतदान कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण

CD

मंचर, ता. ३१ : आंबेगाव तालुक्यात होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नियुक्त करण्यात आलेल्या मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांचे दुसरे प्रशिक्षण नुकतेच झाले. प्रशिक्षणात एकूण २४ सेक्टर अधिकारी व सुमारे एक हजार २५० मतदान अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.
अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कवयित्री शांता शेळके सभागृहात प्रथम व त्यानंतर शासकीय तंत्रनिकेतन, महाविद्यालयात प्रात्यक्षिक प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले. आंबेगाव-जुन्नर विभागाचे प्रांत तथा निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद शिंदे यांनी प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन केले.
प्रशिक्षणादरम्यान निवडणूक प्रक्रियेतील महत्त्वाचे अधिनियम, मतदानाच्या आदल्या दिवशी करावयाची पूर्वतयारी, मतदान केंद्राची उभारणी व रचना, अभिरूप मतदानाची कार्यपद्धती व सिलिंग प्रक्रिया यांची माहिती देण्यात आली. तसेच मतदान सुरू होण्यापूर्वी, मतदानादरम्यान व मतदान समाप्तीनंतर घ्यावयाची काळजी, मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांची भूमिका व जबाबदाऱ्या स्पष्ट करण्यात आल्या.
मतदार सहाय्यता कक्ष, आक्षेपीत व प्रदत्त मते, दिव्यांग, अंध व अपंग मतदारांसाठी विशेष सुविधा, मतदानादरम्यान उद्भवणारी विशेष प्रकरणे, घोषणापत्रांची माहिती, मतदान समाप्तीनंतर मतदान यंत्र मोहोरबंद करणे व ॲड्रेस टॅग लावणे, विविध लिफाफे तसेच टपाली मतदानाबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी पूनम मेहता यांची मुख्य निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती झाल्याची माहिती देण्यात आली.
या प्रशिक्षण कार्यक्रमास करमणूक कर विभागाचे तहसीलदार सतीश थेटे, आंबेगावचे तहसीलदार डॉ. सचिन वाघ, सचिन मुंडे, गटविकास अधिकारी अर्चना कोल्हे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. नियुक्त करण्यात आलेल्या मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांचे दुसरे प्रशिक्षण अवसरी येथे उत्साहात व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari : विमान अपघातावर मिटकरींचे गंभीर प्रश्न; सहा मृतदेहांपैकी एकाचा ठावठिकाणा अद्याप अज्ञात

Railway recruitment: रेल्वेमध्ये तब्बल २० हजारांहून अधिक 'ग्रुप डी' पदांसाठी भरती सुरू ; इयत्ता दहावी उत्तीर्ण उमेदवारही करू शकतात अर्ज

Pune Water News: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! ८ ते १० दिवस पाणीपुरवठा विस्कळीत होणार; पाणीटंचाईची भीती

Sangli Hit And Run : गणपती पेठेत ‘हिट अँड रन’चा थरार, चार पोलिसांसह अकरा जखमी; नशेतधुंद कार चालकास जमावाने तुडवले

Rohit Shetty House Firing Case : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबारप्रकरणी पुण्यातून पाचजण ताब्यात, गॅंगस्टर बिश्नोई टोळीशी संबंधाचा संशय

SCROLL FOR NEXT