पुणे

सातकरवाडी- सुपे येथे रक्तदान, नेत्र तपासणी

CD

पाईट, ता. २९ ः खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पश्चिम विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सातकरवाडी-सुपे येथे रक्तदान शिबिर, मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप करण्यात आले. शिवाई महिला सामाजिक संस्थेच्या सहकार्याने शिबिर संपन्न झाले.
शिबिराचे उद्‍घाटन पुणे जिल्हा सहकारी दूध संघाचे संचालक अरुण चांभारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित उपसभापती विठ्ठल वनगरे, माजी जिल्हा परिषद सदस्या मंगल चांभारे, शिवाई संस्थेच्या सुजाता पचपिंड (पश्चिम विभाग महिला अध्यक्षा), जयसिंग दरेकर, सतीश चांभारे, भोरगिरीच्या सरपंच अर्चना वनगरे, नामदेव गोपाळे, विजय खंडागळे, विष्णू साबळे, बबन गोपाळे, डॉ. चंद्रकांत हिवरकर, शिवाजी पचपिंड आदी उपस्थित होते. या शिबिरात १९८ रुग्णांची डोळे तपासणी होऊन त्यामधील ११० रुग्णांना मान्यवरांच्या हस्ते मोफत चष्मे वाटप करण्यात आले. तर ४१ ग्रामस्थांनी रक्तदान केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

T20 WC 2024 Team India Squad : हार्दिकला कॅप्टन्सीवरून का हटवलं...? आगरकर गडबडला अन् रोहितनं सावरलं

PM Modi Speech : लव्ह जिहाद, लँड जिहाद, आता वोट जिहाद...; PM मोदींची काँग्रेसवर घणाघाती टीका

Brij Bhushan Singh: भाजपनं ब्रिजभूषण सिंहचं तिकीट कापलं! पण मुलाला दिली उमेदवारी; रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

SCROLL FOR NEXT