पिरंगुट, ता. २ : ‘सवाई सर्जाचं चांगभलं’च्या जयघोषात लवळे (ता. मुळशी) येथील मंदिरात श्री नाथ म्हस्कोबा आणि माता जोगेश्वरी यांचा विवाह सोहळा संपन्न झाला. येथील राऊतवाडीतील प्रतिवीर समजले जाणारे नाथ म्हस्कोबा मंदिर देवस्थानच्यावतीने आयोजित केलेल्या या विवाह सोहळ्यासाठी भाविकांनी मंदिर परिसर गजबजून गेला होता.
राऊतवाडीतील श्री नाथ म्हस्कोबाचे देवस्थान हे मूळचे पुरंदर तालुक्यातील वीर येथील नाथ म्हस्कोबा देवस्थान आहे. वीर येथील वेळोवेळी होणारे सर्व विधी लवळे येथेही होतात. त्यासाठी लवळे येथील राऊतवाडीतील मंदिरात दरवर्षी भाविक गर्दी करतात. सोहळ्यावेळी महिला भाविकांची उपस्थिती लक्षणीय होती. भाविकांच्या आणि मानकऱ्यांच्या उपस्थितीत विवाह सोहळा पार पडला. त्यानिमित्त पहाटे देवाला अभिषेक, दुपारी देवाच्या मूर्तींना पोशाख तर सायंकाळी सहा वाजता हळदी समारंभ, त्यानंतर विवाह सोहळा झाला. यावेळी मंदिर परिसरात फुलांची सजावट तसेच विद्युत रोषणाई करण्यात आली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.