पुणे

कासारी फाटा येथे वाहतूक कोंडीचा कहर

CD

तळेगाव ढमढेरे, ता.२७: कासारी फाटा (ता. शिरूर) येथील चौकात पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर सोमवारी (ता.२८) सकाळपासूनच दोन्ही बाजूने वाहतूक कोंडीने कहर केला होता. यामुळे प्रवासी, स्थानिक तसेच वाहनचालक त्रस्त झाले होते.
वाहतूक कोंडी नित्याची झाली असून, येथील चौकात दोन वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांची कायमस्वरूपी नेमणूक करावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.
कासारी फाटा चौकाचा वाहनचालक इकडून तिकडे वाहने वळविण्यासाठी सर्रास उपयोग करतात. तसेच कासारी फाटा येथूनच अहिल्यानगर मार्गे येणारी वाहने तळेगाव ढमढेरे - एल अँड टी फाट्यामार्गे पुण्याकडे जातात. तसेच पुण्याकडून येणारी उलट्या दिशेने चौक ओलांडून पुढे अहिल्यानगरला वाहने जातात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली दिसून येते. तसेच कासारी फाटा चौकात दोन्ही बाजूने रस्त्यावर गतिरोधकाची उंची वाढवण्याची गरज आहे. तसेच येथे इशारा देण्यासाठी लाल दिवे दोन्ही बाजूने बसवणे गरजेचे आहे. याच चौकातून पुणे, सणसवाडी, शिक्रापूर, कोंढापुरी, रांजणगाव एमआयडीसी, शिरूर मार्गे अहिल्यानगरकडे वाहने जातात. येथील चौकातून निमगाव म्हाळुंगी, राऊतवाडी, बुरुंजवाडी, गनेगाव, कासारी, शिक्रापूर आणि तळेगाव ढमढेरे या गावांची वाहतूक मोठ्या प्रमाणात चालते. तसेच दुचाकी, शालेय विद्यार्थी, स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणात ये-जा करतात. त्यामुळे वाहतूक कोंडीला सर्वांनाच सामोरे जावे लागते.
08280

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : 'कोणीही माईका लाल आला, तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

Pune News: राज्य शासनाचा माेठा निर्णय! भूसंपादनाची माहिती आता ऑनलाइन मिळणार; गैरप्रकाराला बसणार आळा..

Warren Buffett Index : दिशादर्शक वॉरेन बफेट निर्देशांक

Republic Day Parade Delhi: कर्तव्यपथावर भिंगारकराने केले व्हीआरडीईच्या वाहनाचे सारथ्य; दिल्लीत प्रजासत्ताक दिनी कर्तव्य!

ठाकरे गटाचे बेपत्ता नगरसेवक १६ दिवसांनी परतले घरी, जल्लोषात झालं स्वागत; VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT