पुणे

कोंढापुरी येथे दादांना श्रद्धांजली अर्पण

CD

तळेगाव ढमढेरे, ता. २ : पुणे जिल्ह्यात सहकार क्षेत्र नावारुपाला आणलेला सहकार क्षेत्रातील वटवृक्ष हरपला अशी भावना जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष व कोंढापुरीचे माजी सरपंच स्वप्निल गायकवाड यांनी व्यक्त केली.
कोंढापुरी (ता. शिरूर) येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या वतीने उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. येथील शोकसभेत गायकवाड बोलत होते.
यावेळीगायकवाड यांनी आपले वडील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी संचालक स्वर्गीय अरुण गायकवाड आणि अजितदादा पवार यांच्या १९९०पासून असलेल्या सहकार क्षेत्रातील संबंधाबाबत आठवणींना उजाळा दिला. शिरूर तालुक्यातील सहकारी संस्थांना उत्कृष्ट कार्याबद्दल अजित पवार यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. यावेळी अरुण आबा गायकवाड उपस्थित होते. अजितदादांमुळेच सहकाराची मुळे ग्रामीण भागापर्यंत पोहोचली त्यात माझ्या वडिलांचाही मोठा वाटा होता. यावेळी दोघांच्याही आठवणींना उजाळा देण्यात आला. अजितदादा आणि अरुण गायकवाड यांच्याबरोबरचे विविध कार्यक्रमातील जुने फोटो पाहून ग्रामस्थांच्या डोळ्यात पाणी आले. यावेळी सोसायटीमार्फत अजितदादांच्या अपघाती निधनाबद्दल शोक व्यक्त करून आठवणींना उजाळा देण्यात आला.
यावेळी सोसायटीचे अध्यक्ष प्रदीप गायकवाड, उपाध्यक्ष अशोक गायकवाड, संचालक किशोर गायकवाड, नामदेव गायकवाड, रामदास भुजबळ, शांताराम गायकवाड, दीपक गायकवाड, महेंद्र घाडगे, अमोल गायकवाड, कर्मचारी किरण कुदळे व ग्रामस्थ उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrapur Congress: चंद्रपूरमध्ये काँग्रेसचा दुसरा गट स्थापन होणार; पक्षातला अंतर्गत वाद दिल्ली दरबारी

7 Minute 11 Second व्हायरल MMS पासून ते 'धुरंधर 2' सीन लीक क्लिपपर्यंत...जानेवारीमध्ये 'हे' टॉप 10 व्हिडिओ होते ट्रेंडिंग

"आमच्या प्रेमात ज्ञानदाने खूप सोसलं" होणाऱ्या नवऱ्याने सांगितली लव्हस्टोरी "आमच्या कास्ट वेगळ्या.."

Latest Marathi News Live Update: लोकसभेचे कामकाज उद्यापर्यंत स्थगित

Palghar Fire: पालघरमध्ये आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट! फर्निचर कंपनीला भीषण आग, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल, Viral Video

SCROLL FOR NEXT