पुणे

विवाहासाठी सजलेली कार्यालये ओस

CD

वडगाव निंबाळकर, ता. ३१ : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाच्या दुःखद घटनेने बारामती तालुक्यातील जनजीवन पूर्णपणे ठप्प झाले आहे. या घटनेचा परिणाम चक्क नियोजित विवाह समारंभांवरही झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. पवार यांच्या निधनाची माहिती कळताच सर्वत्र शांतता पसरली आणि तालुक्यातील अनेक विवाह समारंभ केवळ धार्मिक विधी उरकून अत्यंत साधेपणाने लग्न पार पाडण्यात आले.
सनई-चौघड्यांचे आवाज थांबले, वाजंत्री शांत झाल्या, कुठेही डामडौल नव्हता. विवाहासाठी सजलेली कार्यालये ओस पडली होती. आनंदाचा गजर असावा, अशा ठिकाणी फक्त नीरव शांतता अनुभवायला मिळाली.
वडगाव निंबाळकर येथील अभिजित प्रदीप दरेकर यांचा शुभविवाह शिरवळ (ता. खंडाळा, जि. सातारा) येथे नियोजित होता. सकाळी उत्साहात निघालेल्या वऱ्हाडी मंडळींना सोशल मीडियावरून दादांच्या निधनाची बातमी समजताच संपूर्ण वातावरण बदलले. काही नागरिक बारामतीकडे धाव घेऊन घटनेची खातरजमा करत होते. अखेरीस मोजक्या नातेवाइकांच्या उपस्थितीत हा विवाह साधेपणाने पार पडला.
सदोबाचीवाडी (ता. बारामती) येथील अभिषेक कार्यालयात पुणे कर्वेनगर येथील करे व बरकडे कुटुंबांचा विवाह नियोजित होता. मात्र येथेही वाजंत्री माघारी गेल्या, गोडधोड टाळण्यात आले आणि साधा स्वयंपाक करण्यात आला. कोऱ्हाळे बुद्रुक येथील सिद्धिविनायक कार्यालयातही विवाह फक्त धार्मिक विधींनीच पार पडल्याची माहिती दत्तात्रेय गावडे यांनी दिली.
दादांच्या निधनामुळे सर्वसामान्य नागरिकांनी आपला वैयक्तिक आनंद बाजूला ठेवून, समाजासाठी अखंड झटणाऱ्या नेतृत्वाला अशा अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली वाहिल्याचे या घटनांतून दिसून आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुण्यात नवीन शासकीय विश्रामगृह; लष्कर परिसरात ४८ कक्षांची इमारत, ३३ कोटींचा खर्च, ४८ कक्ष उपलब्ध राहणार!

Nashik Municipal Corporation : नाशिकच्या महापौरपदासाठी भाजपचा 'सव्वा वर्षाचा फॉर्म्युला'! अडीच वर्षांत दोन महिलांना मिळणार संधी?

Union Budget 2026: मोठी बातमी! 15,000 शाळा व 500 कॉलेजमध्ये कंटेंट क्रिएटर लॅब्स, गेमिंगमध्ये 10 लाख नोकऱ्यांचा मार्ग मोकळा

Nashik News : नाशिकच्या उद्योग जगतात सत्तांतर! 'आयमा'च्या अध्यक्षपदी राजेंद्र पानसरे यांचा दणदणीत विजय

मुंबई ओपन टेनिस: अंकिता रैनाची विजयी सलामी; आकांक्षा नित्तुरेवर मिळवला दणदणीत विजय

SCROLL FOR NEXT