पुणे

आडाचीवाडीला नक्की येईन

CD

वाल्हे, ता. २९ : ‘आडाचीवाडीला नक्की येईन’, असा शब्द देऊन गेलेले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार प्रत्यक्षात मात्र आपल्या पवार भावकीच्या भेटीस येऊ शकले नाहीत. त्यांच्या आकस्मिक निधनाच्या बातमीने पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी गावावर शोककळा पसरली असून, दिलेला शब्द अपूर्ण राहिल्याची हळहळ ग्रामस्थांच्या मनात घर करून राहिली आहे.
पुणे येथे सप्टेंबर २०२५मध्ये छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियानांतर्गत आयोजित सेवा पंधरवडा कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत अजित पवार यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधताना आडाचीवाडी ग्रामपंचायतीने अल्पावधीत राबविलेल्या लोकाभिमुख विकासकामांचे त्यांनी मुक्तकंठाने कौतुक केले होते. आडाचीवाडी ग्रामपंचायतीने राबविलेल्या उपक्रमांचे इतर गावांनीही अनुकरण करावे, असे आवाहन करत आडाचीवाडी हे माझ्या भावकीचे गाव असून, येथे मोठ्या प्रमाणावर पवार आडनावाची कुटुंबे वास्तव्यास आहेत, असे पवार म्हणाले होते. याच कार्यक्रमात येथील उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के व ग्रामस्थांशी काही काळ हास्यविनोदात रमणाऱ्या अजितदादांनी लवकरच स्वतः आडाचीवाडीला भेट देऊन भावकीची भेट घेण्याचे आश्वासन दिले होते. उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांनी गावातील सर्व नागरिकांना एकत्र आणत १५ पाणंद रस्त्यांचे बांधकाम करून ते खुले करण्यात आले असून, त्या रस्त्यांना विविध महापुरुषांची नावे देण्यात आली आहेत. ही कामे प्रशासन व ग्रामस्थांच्या समन्वयाचे उत्तम उदाहरण असल्याचे पवार यांनी आपल्या भाषणात अधोरेखित केले होते.
रस्त्याच्या दुतर्फा फळझाडांची लागवड, गावांतर्गत रस्ते, अद्ययावत स्मशानभूमी, प्रशस्त व्यायामशाळा यासह विविध पायाभूत सुविधा उभारण्यात आडाचीवाडीने आदर्श निर्माण केल्याचे अजित पवार यांनी आपल्या भाषणात नमूद केले होते. अधिकाऱ्यांनी ठरविले तर सामान्यांचा त्रास नक्कीच कमी करता येतो, असे सांगत त्यांनी संबंधित उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांचे कौतुक केले होते.

मात्र, बुधवारी (ता. २८) सकाळी अजित पवार यांच्या विमान अपघाताची बातमी सोशल मीडियावर झळकताच आडाचीवाडीत वातावरण गहिवरले. घराघरांतून शोकभावना व्यक्त होत होत्या. दादांनी दिलेला शब्द आठवत भेटीचा शब्द अपूर्ण राहिला, या भावनेने पवार भावकीने अश्रूंना वाट मोकळी करून दिली. पवार यांच्या स्मृती जतन करण्यासाठी ग्रामस्थांनी त्या कार्यक्रमातील ध्वनीफीत, छायाचित्रे आणि वृत्तपत्रातील बातम्यांची कात्रणे मोबाईल स्टेटसद्वारे शेअर करत अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली अर्पण केली असल्याचे सरपंच सुवर्णा पवार, उपसरपंच मोहन पवार यांनी सांगितले.

भावकी पाळणार तीन दिवस सुतक
अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर आडाचीवाडी गावावर शोककळा पसरली आहे. आडाचीवाडीला नक्की येईन, असा शब्द देऊन गेलेले उपमुख्यमंत्री अजित पवार प्रत्यक्षात मात्र आपल्या पवार भावकीच्या भेटीस येऊ शकले नाहीत. दिलेला शब्द अपूर्ण राहिल्याची हळहळ ग्रामस्थांच्या मनात घर करून राहिली आहे. आडाचीवाडी पवार भावकीने तीन दिवस सुतक पाळले आहे. यावरून आडाचीवाडीच्या मातीशी अजितदादांचे असलेले नाते या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Income Tax Slab : मध्यमवर्ग नाराज! करदात्यांसाठी टॅक्स स्लॅब बाबत बजेटमध्ये काय घोषणा?

Tobacco Tax Explained : सिगारेटचा झुरका होणार महाग! आजपासून मोदी सरकारकडून नवी कर प्रणाली लागू; किती द्यावा लागणार टॅक्स?

Budget 2026 Highlights : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या 10 महत्वाच्या घोषणा, वाचा एका क्लिकवर

Latest Marathi News Union Budget 2026 Live : प्रत्येक जिल्ह्यात मुलींसाठी हॉस्टेल बांधणार

Praful Patel Clarification : राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर मोठा गोंधळ! अखेर प्रफुल पटेलांनी दिलं स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT