वाल्हे, ता. २ : वाल्हे (ता. पुरंदर) येथील रयत शिक्षण संस्थेच्या महर्षी वाल्मीकी विद्यालयास सासवड (ता. पुरंदर) येथील स्व. एकनाथ काका जगताप प्रतिष्ठानच्या वतीने १६ सीसीटीव्ही कॅमेरे देण्यात आले. संतोष जगताप यांच्या माध्यमातून ही सुविधा विद्यालयास उपलब्ध करून देण्यात आली.
या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे संपूर्ण विद्यालय परिसर कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली आला असून, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसह शालेय शिस्त
आणि व्यवस्थापन अधिक बळकट होणार आहे. तसेच, इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना आगामी परीक्षांना सामोरे जाताना उपयुक्त ठराव्यात यासाठी अभ्यासासाठी सराव प्रश्नपत्रिका संचाचे वाटपही यावेळी करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य सतीश निगडे होते. यावेळी साक्षी मेमाणे, फारुक इनामदार, लक्ष्मण भालसिंग, सुनील ढवळे, संगीता पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी साक्षी मेमाणे यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने वेळेचे नियोजन, लेखन कौशल्य आणि तणाव व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन केले. तसेच, आधुनिक शिक्षणात वाढत असलेल्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) वापराबाबतही त्यांनी माहिती दिली.
प्रास्ताविकामध्ये प्राचार्य सतीश निगडे यांनी आपल्या भाषणात स्व. एकनाथ काका जगताप प्रतिष्ठानच्या अशा सामाजिक उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील शाळांचा दर्जा उंचावण्यास मदत होत असल्याचे नमूद केले. सहशिक्षक सुदाम गायकवाड यांनी सूत्रसंचालन, तर सहशिक्षक अजित फंड यांनी आभार मानले.
06357
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.