पुणे

पुणे शहरातील पाच महाविद्यालयात ‘अकौंटन्सी म्युझियम’ची उभारणी

CD

पुणे, ता. १ : अकौन्टसीमध्ये होत गेलेली प्रगती, जुन्या काळातील हस्तलिखिते, व्यवहाराच्या बदलत्या पद्धती, जगभरातील संग्रहालयांमध्ये साठवलेल्या कलाकृतींची छायाचित्रे, महत्त्वाची जर्नल्स, जुने ताळेबंद अशी खासियत असणारे ‘अकौंटन्सी म्युझियम’ दि इन्स्टिट्यूशन ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) पुणे शाखेतर्फे शहरातील पाच महाविद्यालयात उभारले आहे.
आयसीएआय वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिलच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला. नेस वाडिया कॉलेज ऑफ कॉमर्स, अण्णासाहेब मगर महाविद्यालय (हडपसर) आणि एस. एम. जोशी महाविद्यालयातील या संग्रहालयाचे उद्‌घाटन ''आयसीएआय''च्या पुणे शाखेचे अध्यक्ष सनदी लेखापाल (सीए) समीर लड्डा यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी उपाध्यक्षा सीए काशिनाथ पाठारे, सीए अमृता कुलकर्णी आदी उपस्थित होते. तर मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स (शिवाजीनगर) आणि मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज ऑफ कॉमर्स या महाविद्यालयात संग्रहालयाचे उद्‌घाटन आयसीएआयच्या केंद्रीय समितीचे सदस्य, सनदी लेखापाल चंद्रशेखर चितळे यांच्या हस्ते झाले. यावेळी ‘आयसीएआय’चे शाखा प्रमुख दीपक कोरगावकर आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT