School start sakal
पुणे

शाळा सुरू-बंदच्या निर्णयामुळे संभ्रमावस्था

परीक्षा आणि अभ्यासाची करा पक्की तयारी; शिक्षणतज्ञांचे मत

सकाळ वृत्तसेवा

पुणे : जागतिक आरोग्य संघटनेने लॉकडाउन करताना शाळा हा शेवटचा पर्याय असल्याचे सांगितले आहे. मात्र, राज्यात यासंबंधीच्या धोरणात अनिश्चितता दिसते. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालक आणि शिक्षकांच्या नियोजनावर तसेच मानसिकतेवरही परिणाम होत आहे. परिस्थिती जरी बदलली तरी विद्यार्थ्यांनीही आता काटेकोर अभ्यास आणि परीक्षेसाठी तयार व्हायला हवे, असे मत शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. (School start-off Confusion over decision)

ओमिक्रॉनच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सुरुवातीला १४ फेब्रुवारीपर्यंत शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, आजाराची सौम्य लक्षणे पाहता, तसेच विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान लक्षात घेता इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळा उघडण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच महाविद्यालये सुरू करण्यासंदर्भातही हालचाली होऊ लागल्या. मात्र, या सर्व प्रक्रियेत अनिश्चितता आणि धरसोड वृत्ती दिसत आहे. पर्यायाने विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवरही मोठा परिणाम झाला आहे. यामुळे अध्ययन, अध्यापन आणि मूल्यमापनसुद्धा प्रभावित होत आहे. अभ्यासाचे नुकसान टाळण्यासाठी विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांनी समन्वयाने काम करणे गरजेचे आहे.

विद्यार्थ्यांसाठी सल्ला :
- अभ्यासात खंड पडू देऊ नये
- मित्रांच्या साहाय्याने सहअध्ययनावर भर द्यावा
- परीक्षेच्यादृष्टीने पूर्ण तयारी करावी
- शिक्षक आणि पालकांची मदत घ्यावी

शिक्षकांसाठी :
- ऑनलाइन आणि ऑफलाइन अध्यापनाचे नियोजन करावे
- विद्यार्थ्यांच्या कलाने अध्यापन करावे
- शाळा आणि बोर्ड स्तरावरील परीक्षेच्यादृष्टीने विद्यार्थ्यांची तयारी करावी
- मागे राहिलेला अभ्यासक्रम स्वयंअध्ययन, सूक्ष्म नियोजन, चाचणी परीक्षेच्या माध्यमातून पूर्ण करावा
- पालकांचाही सहभाग वाढवावा, विद्यार्थ्यांची चांगली तयारी करून घ्यावी

पालकांसाठी :
- शिक्षकांच्या सल्ल्याने पाल्याला अभ्यासात मदत करावी
- परीक्षा आणि काटेकोर अभ्यासासाठी मानसिकता तयार करावी
- पाल्याच्या कलाने अभ्यासाची तयारी करून घ्यावी

शाळा सुरू-बंदच्या निर्णयामुळे संभ्रमावस्था आहे. शिक्षकांसह विद्यार्थ्यांनीही अभ्यासाचे नियोजन करणे गरजेचे आहे. अध्ययन आणि अध्यापनाचे माध्यम बदलेल, परंतु काटेकोर अभ्यास आणि परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची तयारी हवी. वर्गातील चाचणी परीक्षेच्या माध्यमातून, तसेच सूक्ष्म नियोजनातून कच्चा राहिलेला अभ्यास पूर्ण करावा.
- मंजूषा गोंगले, शिक्षक, एस. व्ही. युनियन ज्युनिअर कॉलेज

भराभर अभ्यासक्रम पूर्ण न करता, विद्यार्थ्यांच्या कलाने अध्यापन करण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे प्राधान्य लक्षात घेता, स्वयंस्फूर्तीने पुढे येणाऱ्या पालकांचीही मदत घ्यायला हवी. शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी परिस्थिती जरी बदलली तरी शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांचे एकत्रित प्रयत्न गरजेचे आहेत.
- डॉ. वसंत काळपांडे, शिक्षणतज्ज्ञ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Chandgad MD Drugs Case: चंदगड पोलिस, पालकांची जबाबदारी वाढली; हाजगोळी ड्रग्ज प्रकरण; मुलांच्या वर्तणुकीकडे लक्ष ठेवण्याची गरज

Sparrow Chick Rescue : घरट्यातून पिल्लू खाली पडलं अन्...; चिमणीची लेकरासाठी जीवाचा आकांत करणारी धडपड पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, हॉस्पिटलबाहेरील 'तो' प्रसंग नक्की काय?

Latest Marathi News Live Update : कंत्राटदाराने जीवन संपवल्याने सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

Vastu Shastra: झाडू ठेवण्याचीही असते योग्य दिशा? वास्तुशास्त्रातील ‘हा’ नियम जाणून घ्या

SCROLL FOR NEXT