Panchnama Sakal
पुणे

पुस्तकाला मोठा भाव; लेखकाला वडापाव!

‘साहेब, मी रामू वडेवाला बोलतोय. मला तुमची पुस्तके खूप आवडतात. तुमचं पुस्तक हाती घेतल्यावर ते कधी संपतं, हेच कळत नाही.’

सु. ल. खुटवड

‘साहेब, मी रामू वडेवाला बोलतोय. मला तुमची पुस्तके खूप आवडतात. तुमचं पुस्तक हाती घेतल्यावर ते कधी संपतं, हेच कळत नाही.’

‘साहेब, मी रामू वडेवाला बोलतोय. मला तुमची पुस्तके खूप आवडतात. तुमचं पुस्तक हाती घेतल्यावर ते कधी संपतं, हेच कळत नाही.’

एका छोट्याशा गावातील वडापाव-विक्रेत्याचा फोन आल्यावर दिनेश कोरडेकर भारावून गेले होते. समीक्षकांनी आणि पुरस्कार देणाऱ्या संस्थांनी आपल्यावर नेहमीच अन्याय केला, असा त्यांचा आरोप होता. मात्र, आपले साहित्य तळागाळापर्यंत पोचत आहे व तेथील दर्दी वाचक ते वाचत आहेत, याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर पसरला.

‘सर, तुमचे कवितासंग्रह, कथासंग्रह, संशोधनात्मक ग्रंथ मी नेहमी आणतो. तुमच्या पुस्तकांनी माझ्या आयुष्याला मोठा आधार दिला आहे. एसटी स्टॅंडजवळ माझी वडापावची गाडी आहे. कधी इकडे आलात तर माझ्या हातगाडीला भेट द्या. मला तुमच्याबरोबर फोटो काढायचा आहे.’’ रामूने आमंत्रण दिले. त्यानंतर कोरडेकर भेटेल त्याला ‘आपला वाचक खेडो-पाडी पसरला असून, आपले साहित्य तळागाळातील लोक वाचत आहेत. अशा वाचकांचा प्रतिसाद, हा मोठ्या पुरस्कारासारखा आहे. त्यामुळे मला सरकार वा कोणत्या संस्थेच्या पुरस्काराची गरज नाही,’ असे ऐकवू लागले. काही दिवसांपूर्वीच त्यांनी ‘पेशवेकालीन गोवऱ्यांचा चिकित्सक अभ्यास आणि एकविसाव्या शतकातील गॅससिलेंडरशी त्याचा असलेला अन्योन्यसंबंध’ हा संशोधनात्मक ग्रंथ हातावेगळा केला होता. या पुस्तकाचे प्रकाशन एका सर्वसामान्य वाचकांच्या हस्ते करावं, अशी त्यांची इच्छा होती. त्यानुसार त्यांनी रामू वडेवाल्याची निवड केली व त्यानुसार त्यांनी फोन केला.

‘साहेब, मला तुमच्यासारखं नीट बोलता येत नाही.’’ रामूने आढेवेढे घेतले.

‘तू तुझ्याच भाषेत बोलायचं. माझ्या पुस्तकांमुळं तुझं जीवन कसं बदललं, एवढंच सांगायचं. त्या दिवशी तुझा व्यवसाय बंद राहणार असल्याने पाच हजार रुपये मी नुकसानभरपाई देतो. शिवाय तुला न्यायला आणि सोडायला मी गाडी पाठवतो. ’’ कोरडेकरांनी दिलेल्या आश्‍वासनामुळं रामू तयार झाला. मग कोरडेकरांनी पुस्तकप्रकाशनाची मोठी जाहिरात केली. आपल्याला समीक्षकांबरोबरच अनेकांनी अनुल्लेखांनी मारलं, याची सल त्यांना होती. त्यामुळे या सगळ्यांवर सूड घ्यायची, हीच संधी आहे, असे ठरवून त्यांनी तयारी केली.

कार्यक्रमाचा दिवस उजाडला. प्रकाशन सोहळा एकदम झोकात झाला. त्यानंतर रामू भाषण करण्यासाठी उठला. समोरची गर्दी पाहून तो कावरा- बावरा झाला. तो म्हणाला, ‘‘साहेबांच्या पुस्तकांमुळे माझ्या जीवनाला ‘अर्थ’ प्राप्त झाला आहे. त्यांच्या पुस्तकांच्या कागदाचा दर्जा खूपच चांगला असतो. त्यामुळे ग्राहकांना वडापाव देण्यासाठी मला त्याचा खूप उपयोग होतो. या पुस्तकाचा कागद वड्याचे तेल शोषून घेतो. त्यामुळे वडे तेलकट आहेत, अशी तक्रार एकाही ग्राहकाने आतापर्यंत केली नाही. वडापाव खाऊन झाल्यानंतर कागदाचा बोळा करून प्लॅस्टिकच्या ड्रममध्ये टाकल्यानंतर हा कागद जास्त जागा व्यापत नाही. त्यामुळे मला सारखं सारखं ड्रम मोकळा करावा लागत नाही. वडापाव पार्सल देण्यासाठी तर या कागदासारखा दुसरा कागद मला शोधून सापडला नाही. साहेबांची पुस्तके मी पुण्यातील पूजा रद्दी केंद्रातून दहा रुपये किलोने घेतो. रद्दी केंद्राचे मालक माझे मित्र असल्याने दर महिन्याला माझ्यासाठी ते शंभर किलो पुस्तके मुद्दाम बाजूला काढून ठेवतात.

साहेबांच्या पुस्तकामुळे माझा वडापावचा व्यवसाय भरभराटीला आला आहे. त्यांचे हे उपकार मी कधीही विसरणार नाही. अनेक वडापाव विक्रेत्यांना मी साहेबांच्या पुस्तकाची शिफारस केली आहे. माझ्यासह अनेकांचा व्यवसाय वाढीसाठी साहेबांनी पुस्तके लिहीत राहावे, अशा शुभेच्छा मी देतो आणि आताच मी नवे पुस्तक शंभर किलो घेतो.’’ असे म्हणून रामू खाली बसला. त्याचं हे भाषण ऐकून कोरडेकर त्याच्याकडं हताशपणे बघतच राहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: Virat Kohli त्याचे सामनावीर ट्रॉफी कुठे ठेवतो? न्यूझीलंडविरुद्ध पुरस्कार जिंकल्यानंतर सांगून टाकलं

WPL 2026, DC vs GG: १ बॉल अन् ५ धावा... गुजरात जायंट्सने मिळवला थरारक विजय, जेमिमाच्या दिल्लीचा सलग दुसरा पराभव

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

SCROLL FOR NEXT