Pune Municipal Corporation Sakal
पुणे

पुणे महापालिका : निवडणुकीसाठी लागणार २५ हजार कर्मचारी

निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर निवडणुकीच्या कामकाजाला गती येणार आहे,

CD

पुणे: पुणे महापालिकेच्या निवडणुकीची तयारी राजकीय पक्षांकडून सुरू असताना प्रशासनानेही निवडणुकीची यंत्रणा उभी करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून ते मतमोजणी पूर्ण होईपर्यंत सुमारे २५ हजार कर्मचाऱ्यांची आवश्‍यकता आहे. त्यासाठी महापालिकेने तयारी सुरू केली आहे.


पुणे महापालिकेची निवडणूक कधी जाहीर होणार?, याची उत्सुकता इच्छुक उमेदवार, कार्यकर्त्यांसह नागरिकांमध्ये आहे. निवडणूक आयोगाने प्रारूप प्रभागरचना जाहीर केल्यानंतर त्यावर हरकती-सूचना दाखल झाल्या आहेत. त्यावर आता २४ फेब्रुवारी रोजी सुनावणी घेतली जाणार आहे. अंतिम प्रभागरचना जाहीर झाल्यानंतर आरक्षणाची सोडत काढली जाणार आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षणाचा प्रश्‍न निकाली लागल्याशिवाय महापालिकेची निवडणूक होणार नाही, असे सांगितले जात आहे. तर इयत्ता दहावी, बारावीची परीक्षा संपली की निवडणूक घेतली जाईल असाही अंदाज वर्तविला जात आहे.
निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर निवडणुकीच्या कामकाजाला गती येणार आहे, पण त्यासाठी आवश्‍यक असलेले मनुष्यबळ उपलब्ध करून घेण्यासाठी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. सध्या पुणे महापालिकेचे सुमारे ६०० अधिकारी-कर्मचारी या कामात सहभागी आहेत.

मतदारयाद्यांसाठी प्रशिक्षण
निवडणूक आयोगाकडून महापालिकेला मतदारयाद्या प्राप्त झाल्या आहेत. प्रभागानुसार मतदारयाद्या तयार केल्या जाणार आहेत. त्यासाठी क्षेत्रीय कार्यालयस्तरावरील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रभागनिहाय मतदारयादी तयार केली जाणार असली तरी अंतिम प्रभागरचना जाहीर झाल्यानंतर त्या प्रभागात जसे बदल केले जातील, तशा मतदारयाद्याही बदलल्या जातील.

केंद्रांसह कर्मचारीही वाढणार
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर व मतदारांच्या सोईसाठी मतदान केंद्रांची संख्या वाढवली जाणार आहे. त्यामुळे एक मतदान केंद्र वाढले की त्या ठिकाणी कर्मचारी संख्या, पोलिस बंदोबस्त यामध्येही वाढ होते. यासाठी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसह शासनाचे कर्मचारी, शिक्षक यांनाही निवडणुकीचे काम दिले जाणार आहे.

कर्मचाऱ्यांची माहिती मागवली
निवडणुकीच्या तयारीसाठी महापालिका प्रशासनाने मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेच्या प्रत्येक विभागातील कर्मचाऱ्यांची माहिती मागवली होती. त्यानुसार १६ हजार जणांची माहिती आलेली आहे. पण दरम्यानच्या काळात अनेकजण सेवानिवृत्त झाले असल्याने आकड्यांमध्ये बदल होऊ शकतो, असे प्रशासनाने सांगितले.


पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी २० ते २५ हजार कर्मचारी लागणार आहेत. त्याचा आढावा घेण्यासाठी महापालिकेतील कर्मचाऱ्यांची माहिती मागविली आहे. निवडणूक आयोगाकडून ज्या पद्धतीने पुढील सूचना येतील त्याप्रमाणात मनुष्यबळ उपलब्ध करावे लागणार आहे. मतदान संख्या, मतमोजणी याचे नियोजन करून शासनाकडे कर्मचाऱ्यांची मागणी केली जाईल.
- रवींद्र बिनवडे, अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ताम्हिणी घाटात थार दरीत कोसळून ६ जणांचा मृत्यू, ३ दिवसानंतर अपघात झाल्याचं आलं समोर

Kolhapur circuit bench: १० वर्षांहून अधिक खुर्चीला चिकटून बसलेले संचालक जाणार घरी! २६ बँकांमधील संचालकांनी भितीने घेतली सर्किट बेंचमध्ये धाव

Latest Marathi News Update LIVE : शितल तेजवानी पुणे पोलिस आयुक्तालयात दाखल

Cricket Record: सचिन तेंडुलकर, विराट कोहली, पाँटिंगलाही न जमलेला विश्वविक्रम विंडिजच्या होपने करून दाखवला; धोनीशीही बरोबरी

Diamond Found 300 kg : अन्नाला महाग असलेल्या देशात सापडला ३०० किलोचा हिरा, राष्ट्रपतींचा तातडीचा निर्णय चर्चेत

SCROLL FOR NEXT