पुणे

कात्रज-गोकुळनगर : मनसे-भाजपचे राष्ट्रवादीला आव्हान

महापालिकेची नवीन प्रभागरचना जाहीर झाल्यानंतर कात्रजमधील समाविष्ट गावांना जोडून नव्या प्रभागाची रचना करण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा

महापालिकेची नवीन प्रभागरचना जाहीर झाल्यानंतर कात्रजमधील समाविष्ट गावांना जोडून नव्या प्रभागाची रचना करण्यात आली.

कात्रज - एका बाजूला उंच डोंगरांमधील वाड्या, तर दुसऱ्या बाजूला दाट लोकवस्तीचा भाग अशा तीन विधानसभा मतदारसंघांत नवीन प्रभाग कात्रज-गोकुळनगर (Katraj-Gokulnagar) (प्रभाग क्रमांक ५८) विभागला गेला आहे. राष्ट्रवादीचे (NCP) वर्चस्व असलेला हा प्रभाग वाटत असला तरी मनसे (MNS) आणि भाजपकडून (BJP) तगडे आव्हान (Challenge) मिळणार असल्याने या प्रभागात रंगत वाढणार आहे.

महापालिकेची नवीन प्रभागरचना जाहीर झाल्यानंतर कात्रजमधील समाविष्ट गावांना जोडून नव्या प्रभागाची रचना करण्यात आली. राष्ट्रवादीला पूरक मानला जाणारा मांगडेवाडी, भिलारेवाडी आणि गुजर-निंबाळकरवाडी हा ग्रामीण भाग जोडण्यात आला आहे. तसेच आगममंदिर, संतोषनगरसह आंबेगाव (बुद्रुक), शनिनगर आणि दत्तनगरचाही काही भाग जोडण्यात आला आहे. ग्रामीण भाग व डोंगरी भाग जोडल्याने उमेदवारांची चांगलीच दमछाक होणार आहे.

कात्रज परिसरात मनसेची शक्ती आहे. पक्षाचे शहराध्यक्ष याच प्रभागांतून निवडणूक लढविणार आहेत. भाजपचे वर्चस्व असलेल्या जुन्या प्रभाग क्रमांक ४१ चा भाग या नव्या रचनेला जोडला गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला सोप्या वाटणाऱ्या या प्रभागात विजयासाठी तगडे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे.

पुरंदर विधानसभा मतदारसंघाचा बराचसा भाग या प्रभागात येतो, येथे शिवसेनेची काही प्रमाणात ताकद आहे. राष्ट्रवादीसोबत शिवसेनेशी आघाडी झाली तर त्याचा फायदा दोन्ही पक्षांना होईल अन्यथा त्याचा लाभ भाजप व मनसेला अधिक होण्याची शक्यता आहे. उपनगरांमध्ये विभागला गेलेल्या या प्रभागात नव्या समाविष्ट गावांसह जुन्या हद्दीतील इच्छुकांची संख्या मोठी आहे. हडपसर, पुरंदर आणि खडकवासला या तीन विधानसभा मतदारसंघात हा प्रभाग विभागला गेला आहे. येथे राष्ट्रवादी, काँग्रेस आणि भाजपचे विद्यमान आमदार आहेत. तर हडपसर विधानसभा मतदारसंघात मनसेने चांगली टक्कर दिली होती, त्यामुळे येत्या निवडणुकीत राष्ट्रवादी-मनसे-भाजप अशी तिरंगी लढत दिसेल.

सन २०११ च्या जनगणनेनुसार ५७ हजार ८४७ असली तरी प्रत्यक्षात प्रभागाची लोकसंख्या ही दीड लाखाच्यावर असण्याचा अंदाज आहे. मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातून आलेल्या लोकांची संख्या प्रभागांत मोठ्या प्रमाणावर असल्याने त्यांचा निवडणुकीवर प्रभाव निश्चित राहणार आहे.

या भागात मुख्यतः पाणी, ड्रेनेज व कचरा या प्रमुख सदस्यांसह समाविष्ट गावांतील विकास हा प्रमुख मुद्दा आहे. वाड्यांच्या बीडीपी आरक्षणामुळे जमिनी असलेल्या भूमीपुत्रांवर अन्याय झाल्याची भावना स्थानिकांमध्ये आहे. वाहतूककोंडी, महापालिकेचे हॉस्पिटल, शाळा, खेळाची मैदाने, कात्रज घाटाची स्वच्छता आदी महत्त्वाच्या मुद्द्यांसह प्रभागातील मागील ३ वर्षांपासून रखडलेला कात्रज-कोंढवा रस्ता हा महत्त्वाचा प्रश्न आहे.

दृष्टिक्षेपात प्रभाग ५८

कात्रज-गोकुळनगर

  • जनगणनेनुसार लोकसंख्या - ५७,८४७

  • अंदाजे लोकसंख्या १.५ लाखांपेक्षा जास्त

  • अंदाजे मतदार संख्या - ७० हजार

  • मुख्य समस्या - बीडीपी आरक्षण, पाणी, वाहतूककोंडी, ड्रेनेज, कचरा आणि कात्रज-कोंढवा रस्त्याचा रेंगाळलेला प्रश्न

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gotya Gitte: वाल्मिक कराड माझे दैवत, धनंजय मुंडेंना बदनाम करु नका, नाहीतर... फरार गोट्या गित्तेची जितेंद्र आव्हाडांना धमकी, व्हिडिओ व्हायरल

PM Narendra Modi : जागतिक अनिश्‍चिततेत राष्ट्रहित जपणार; ‘स्वदेशी’ वापरण्याचे पंतप्रधानांचे आवाहन

Harshwardhan Sapkal : काँग्रेसचा विचार हा पाकिस्तानचे दोन तुकडे करणारा

Rahul Mote : परंडा मतदारसंघांमध्ये पुन्हा वाजणार का? 'घड्याळाची ठकठक' घड्याळ तेच वेळ नवी!

MP Nilesh Lanke : अहिल्यानगर शहर पोलिस प्रशासनावर राजकीय दबाव; खासदार नीलेश लंके यांचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT