pune zilla parishad awarded late ss gadkari award for innovation in public administration sakal
पुणे

Pune Zilla Parishad : पुणे झेडपीचा एस. एस. गडकरी पुरस्काराने गौरव

गडकरी पुरस्काराचा पुणे झेडपीला मान

सकाळ वृत्तसेवा

पुणे : भारतीय लोकप्रशासन संस्थेच्या महाराष्ट्र शाखेतर्फे दिला जाणारा स्व. एस. एस. गडकरी पुरस्कार पुणे जिल्हा परिषदेला जाहीर झाला आहे. सार्वजनिक प्रशासनात नवकल्पनांच्या अंमलबजावणीसाठी हा पुरस्कार दिला जातो.

हा २०२२-२३ या वर्षासाठीचा पुरस्कार आहे. दहा हजार रुपये आणि प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. शाखेचे अध्यक्ष आणि राज्याचे माजी मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्या हस्ते येत्या नऊ जून रोजी पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान केला जाईल.

पुणे जिल्हा परिषदेने प्रशासनातील कामांना गती देण्यासाठी सरकारी योजनांच्या लाभासाठी ''महालाभार्थी'' ही प्रणाली आणि प्रोसेस मॅपिंग (सुक्ष्म आणि सर्वसमावेशक मूल्यमापन प्रक्रिया) हे दोन नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू केले आहेत.

याबरोबरच अन्य उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी केल्याचे जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांनी सांगितले. हा पुरस्कार म्हणजे जिल्हा परिषदेचे सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमता तसेच परिश्रमाचा हा सन्मान आहे, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

पुणे जिल्हा परिषदेने मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली सुक्ष्म व सर्वसमावेशक मूल्यमापन प्रक्रियेद्वारे विविध विभागांमधील १ हजार १८३ कार्य प्रक्रिया निश्चित केल्या. आवश्यक संकलित माहिती (डेटा), निर्णय घेण्याची आवश्यकता आणि अंमलबजावणी प्रक्रिया विचारात घेऊन प्रत्येक प्रक्रियेचे काळजीपूर्वक परीक्षण करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gotya Gitte: वाल्मिक कराड माझे दैवत, धनंजय मुंडेंना बदनाम करु नका, नाहीतर... फरार गोट्या गित्तेची जितेंद्र आव्हाडांना धमकी, व्हिडिओ व्हायरल

PM Narendra Modi : जागतिक अनिश्‍चिततेत राष्ट्रहित जपणार; ‘स्वदेशी’ वापरण्याचे पंतप्रधानांचे आवाहन

Harshwardhan Sapkal : काँग्रेसचा विचार हा पाकिस्तानचे दोन तुकडे करणारा

Rahul Mote : परंडा मतदारसंघांमध्ये पुन्हा वाजणार का? 'घड्याळाची ठकठक' घड्याळ तेच वेळ नवी!

MP Nilesh Lanke : अहिल्यानगर शहर पोलिस प्रशासनावर राजकीय दबाव; खासदार नीलेश लंके यांचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT