पुणे

मतदानाच्या दिवशी भरपगारी सुटीचा निर्णय

CD

पुणे, ता. १६ : कसबा व चिंचवड या दोन विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीमध्ये उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व उद्योगसमूह, महामंडळे, कंपन्या व संस्थांमध्ये औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापनांमध्ये काम करणारे कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना मतदानाचा हक्क‌ बजावता यावा, यासाठी मतदानाच्या दिवशी भरपगारी सुटी अथवा २ तासांची सवलत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याबाबतचे परिपत्रक राज्य शासनाने जारी केले आहे.

गेल्या काही निवडणुकांमध्ये संस्था, आस्थापना भरपगारी सुटी किंवा सवलत देत नसल्याचे आढळून आले असून, अनेक मतदारांना त्यांच्या मतदानापासून वंचित राहावे लागते. जे लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे. त्यामुळे उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने हे परिपत्रक जारी केले आहे. निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रातील मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही, त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुटी देण्यात यावी.

अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना पूर्ण दिवस सुटी देणे शक्‍य नसेल, तर मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुटीऐवजी कमीतकमी दोन तासांची सवलत देता येईल. मात्र त्याबाबत संबंधित जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे आवश्‍यक राहील. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन तासांची सवलत मिळेल, याची दक्षता संबंधित आस्थापनांनी घेणे आवश्‍यक असल्याचे उद्योग विभागाने म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT