पुणे

मशिनमध्ये नाणे टाकून घ्या कापडी पिशव्या !

CD

पुणे, ता. २५ : खरेदीसाठी बाजारात गेलात, पिशवी जवळ नसेल, तरी चिंता करू नका, कारण कापडी पिशव्यांचे व्हेडिंग मशिन शहराच्या विविध भागांमध्ये बसविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्या मशिनमध्ये ५, १० किंवा २० रुपयांचे नाणे (क्वॉइन) टाकून तुम्हाला कापडी पिशव्या उपलब्ध होणार आहे.
झेन्सार आरपीजी फाउंडेशनतर्फे सीएसआर अंतर्गत आठ कापडी पिशव्या मशिन व एक प्लास्टिक डिस्पोजल मशिन महापालिकेस भेट देण्यात आले. या फाउंडेशनमध्ये सिएट, झेन्सार, केईसी इंटरनॅशनल लिमिटेड, आरपीजी प्रायव्हेट लिमिटेड, आरपीजी लाइफ सायन्सेस लिमिटेड, स्पेन्सर्स आणि कंपनी लिमिटेड अशा विविध संस्थांचा समावेश आहे.
महापालिकेतर्फे प्लास्टिक निर्मूलनासाठी विविध उपाययोजना केल्या जात असताना त्यात नागरिकांचा सहभागही तितकाच महत्त्वाचा आहे. सार्वजनिक ठिकाणी नागरिक प्लास्टिकचा सर्रास वापर करताना दिसतात. हे टाळण्यासाठी त्यांना कापडी पिशव्या वापरण्याचा पर्याय देण्यात येणार आहे. त्यासाठी शहरात सार्वजनिक ठिकाणी व्हेंडिंग मशिन बसविण्यात येणार आहेत. बस व रेल्वे स्थानक, मॉल, विमानतळ, मल्टिप्लेक्स अशा ठिकाणी मशिन बसविणार असल्याचे घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त आशा राऊत यांनी सांगितले.
या वेळी आमदार माधुरी मिसाळ, महापालिका आयुक्त तथा प्रशासक विक्रमकुमार, अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, झेन्सारच्या शुभा कुमार, भानुश्री शर्मा, पालिकेचे मुख्य उद्यान अधीक्षक अशोक घोरपडे, डॉ. केतकी घाटगे, योगेश हेंद्रे, स्वाती देशमुख आदी उपस्थित होते.

बचत गटांना उत्पन्न
साधारण ६५ किलो वजनाच्या एका मशिनमध्ये एकावेळी १५० कापडी पिशव्या बसू शकतात. नागरिकांना ५, १०, २० रुपयांचे नाणे टाकून विविध आकाराच्या पिशव्या उपलब्ध होतील. या पिशव्या तयार करण्याचे काम महापालिका बचत गटांना देणार आहे. त्यातून बचत गटांना उत्पन्न मिळेल, असे आशा राऊत यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सायंकाळी पाच वाजेपर्यंत देशात 60.19 टक्के मतदान; महाराष्ट्रात 53.40 टक्के मतदानाची नोंद

Lok Sabha Election 2024 : EVM ची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

Video: CSK ची प्रॅक्टिस पाहायला आलेला प्रेक्षक डॅरिल मिचेलच्या शॉटने जखमी, आयफोनही तुटला; त्यानंतर काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : आप आमदाराच्या मुलाची पेट्रोल पंप कर्मचाऱ्याला मारहाण; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Subodh Bhave : सुबोधचं बायकोला गोड सरप्राईज; सोशल मीडियावर होतंय कौतुक

SCROLL FOR NEXT