पुणे

नगर रस्त्यावरील बीआरटी मार्गाची लवकरच पाहणी

CD

पुणे, ता. ३० : वाहतुकीला अडथळा ठरत असल्याची सातत्याने टीका होत असलेल्या नगर रस्त्यावरील बीआरटी मार्गाची लवकरच संयुक्त समितीमार्फत दोन दिवसांत पाहणी केली जाणार आहे. महापालिका प्रशासन व पीएमपीएमएल प्रशासनाचे अधिकारी याची पाहणी करणार आहेत, त्यानंतर महापालिका प्रशासन पुढील निर्णय घेणार असल्याचे महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी स्पष्ट केले.

नगर रस्त्यावरील बीआरटी मार्गामुळे वाहतूक कोंडी होत असल्याबाबत सातत्याने टीका होत आहे. दरम्यान, आमदार सुनील टिंगरे यांनीही हा मुद्दा अधिवेशनात उपस्थित केला होता. तर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीदेखील या रस्त्याची पाहणी करून बीआरटीविरोधात भाष्य केले होते. या बीआरटी मार्गामुळे वाहतूक कोंडीत भर पडण्याबरोबरच पावसाच्या पाण्यालाही अडथळा ठरत आहे. बीआरटी मार्गातच मेट्रो मार्गाचेही खांब येणार आहेत. सर्व प्रश्न बीआरटीशी निगडित आहे. तर दुसरीकडे पीएमपीएमएल प्रशासनाकडून बीआरटी काढू नये, अशी भूमिका घेतली जात आहे.

दरम्यान, ‘पीएमआरडीए’च्या हद्दीत देण्यात येणाऱ्या बससेवेच्या संचलनातील सुमारे १८८ कोटी रुपयांची तूट भरून देण्यासंदर्भात पीएमपीएमएलने मागणी केली आहे. पीएमआरडीएच्या ग्रामीण भागात पीएमपीकडून बससेवा दिली जाते. या बससेवेमुळे संचलनातील तूट भरून मिळावी अशी मागणी केली जात होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या महिन्यात पीएमआरडीएच्या प्रतिनिधीचा पीएमपीच्या संचालक मंडळात समावेश करण्याचा निर्णय घेतला. यामुळे तुटीची रक्कम मिळण्यातील तांत्रिक अडचण दूर झाली. गेल्या वर्षभरात पीएमआरडीएच्या हद्दीतील बस संचलनाची तुटीची रक्कम ४७ कोटी रुपये इतकी आहे. तुटीची रक्कम देण्यासंदर्भातील निर्णय पीएमआरडीएच्या बैठकीत होणार आहे.

पीएमपीएमएलच्या संचालक मंडळाच्या बैठकीत या मार्गाबाबत चर्चा झाली. त्यानुसार महापालिका व पीएमपीएमएलचे अधिकारी पुढील दोन दिवसांत बीआरटी मार्गाची प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतरच महापालिका निर्णय घेणार आहे.
- विक्रमकुमार, महापालिका आयुक्त

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT