पुणे

दोनशे पन्नासहून अधिक जणांची आरोग्य तपासणी

CD

पुणे, ता. ३ ः सकाळ माध्यम समूहातील ‘सकाळ सोशल फाउंडेशन’, श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्ट, हिराबाई कावसजी जहाँगीर वैद्यकीय संशोधन संस्था व गुरुनानक दरबार- गुरुनानक मेडिकल फाउंडेशन यांच्यातर्फे दत्तजयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराच्या माध्यमातून २५० हून अधिक जणांची आरोग्य तपासणी करून औषधोपचार करण्यात आले, तर ८६ जणांना मोफत चष्मे देण्यात आले.
शिबिराच्या उद्‍घाटनप्रसंगी ‘सकाळ सोशल फाउंडेशन’चे विश्‍वस्त महेंद्र पिसाळ, श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड. शिवराज कदम-जहागीरदार, खजिनदार युवराज गाडवे, महेंद्र गाडवे, गुरुनानक दरबारचे अध्यक्ष चरणजित सिंग सहानी, नरेंद्रपाल सिंग बक्षी, सुरेंद्र सिंग धुप्पर, अमरजित सिंग छाबडा, मोहिंदर सिंग कंधारी, शिवकुमार सलुजा, हिराबाई कावसजी जहाँगीर वैद्यकीय संशोधन संस्थेच्या संध्या गायकवाड, डॉ. दीपाली लडकत व मोनिश वाघ आदी उपस्थित होते.
आरोग्य शिबिराच्या माध्यमातून रक्तदाब, वजन, उंची, रक्तातील साखर, एचबी, नेत्रतपासणी, औषधोपचार व सल्ला-मार्गदर्शन आदी तपासण्या करण्यात आल्या. याशिवाय माहेश्‍वरी विद्या प्रचारक मंडळ व संस्थेचे माजी विद्यार्थी मंडळ यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास परिसरातील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. रक्तदान शिबिरास व नेत्र तपासणीस अनुक्रमे आचार्य आनंदऋषीजी रक्तपेढी, पूना हॉस्पिटल रक्तपेढी व डॉ. ललवाणी आय क्लिनिक यांचे विशेष सहकार्य लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari : विमान अपघातावर मिटकरींचे गंभीर प्रश्न; सहा मृतदेहांपैकी एकाचा ठावठिकाणा अद्याप अज्ञात

Railway recruitment: रेल्वेमध्ये तब्बल २० हजारांहून अधिक 'ग्रुप डी' पदांसाठी भरती सुरू ; इयत्ता दहावी उत्तीर्ण उमेदवारही करू शकतात अर्ज

Pune Water News: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! ८ ते १० दिवस पाणीपुरवठा विस्कळीत होणार; पाणीटंचाईची भीती

Sangli Hit And Run : गणपती पेठेत ‘हिट अँड रन’चा थरार, चार पोलिसांसह अकरा जखमी; नशेतधुंद कार चालकास जमावाने तुडवले

Rohit Shetty House Firing Case : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबारप्रकरणी पुण्यातून पाचजण ताब्यात, गॅंगस्टर बिश्नोई टोळीशी संबंधाचा संशय

SCROLL FOR NEXT