पुणे

कठडा तोडून दुचाकी भुयारी मार्गात कोसळली

CD

पुणे, ता. १८ : भरधाव दुचाकी कठडा तोडून भुयारी मार्गात कोसळल्याची घटना मंगळवारी रात्री एकच्या सुमारास डेक्कन जिमखाना येथील गरवारे भुयारी मार्गात घडली. यात दुचाकीस्वारासह सहप्रवासी तरुण गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
तन्मय संदीप राऊत (वय २३, रा. श्री रेसीडेन्सी, उत्तमनगर) आणि महेश अनंता इंगळे (वय २८, रा. इंगळे हाईटस, उत्तमनगर) अशी जखमींची नावे आहेत. याबाबत पोलिस शिपाई जगदीश हिरेमठ यांनी डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तन्मय आणि महेश हे खासगी कंपनीत नोकरी करतात. मंगळवारी रात्री दोघे जंगली महाराज रस्त्यावरून दुचाकीवरून डेक्कन जिमखान्याकडे निघाले. गरवारे भुयारी मार्गावर तीव्र वळणावर दुचाकीवरील नियंत्रण सुटले. दुचाकी लोखंडी कठड्यावर आदळली. कठडा तोडून दुचाकीसह तन्मय आणि महेश हे भुयारी मार्गात कोसळली. अपघाताची माहिती मिळताच जगदीश हिरेमठ यांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या दोघांना खासगी रुग्णालयात दाखल केले. सहायक पोलिस निरीक्षक गणेश जाधव तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाकरे गटाचे बेपत्ता नगरसेवक १६ दिवसांनी परतले घरी, जल्लोषात झालं स्वागत; VIDEO VIRAL

Pune News: पुणे मेट्रोच्या विस्ताराला केंद्राचे ‘बळ’; केंद्रीय अर्थसंकल्पात ५१७ कोटी रुपयांची तरतूद, काय हाेणार आहेत फायदे!

Latest Marathi News Live Update : दख्खनचा राजा जोतिबा देवाच्या खेट्यांना येत्या रविवारपासून होणार प्रारंभ

माेठी बातमी! लाडक्‍या बहिणींची होणार फेरपडताळणी; ई-केवायसीमुळे लाभ बंद झालेल्यांना दिलासा, काय दिल्यात सूचना?

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 2 फेब्रुवारी 2026

SCROLL FOR NEXT