narayngaon 
पुणे

टोमॅटो उत्पादकांनो, नारायणगाव बाजारात मिळलाय एवढा भाव   

रवींद्र पाटे

नारायणगाव (पुणे) : जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टोमॅटो उपबजारात आज तीस हजार टोमॅटो क्रेटची आवक झाली. प्रतवारी नुसार टोमॅटो क्रेटला (वीस किलो) २०० रुपये ते ३३० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. या हंगामात टोमॅटोला मिळालेला हा उच्चांकी बाजारभाव असून, आज क्रेटमागे सुमारे दिडशे रुपयांची वाढ झाली आहे. टोमॅटो खरेदी विक्रीतून आज उपबजारात सुमारे ७५ लाख रुपयांची उलाढाल झाली आहे, अशी माहिती सभापती संजय काळे यांनी दिली.

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मागील दोन महिने जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व उपबजार बंद ठेवले होते. या संधीचा फायदा घेऊन व्यापाऱ्यांनी शेतमालाची मातीमोल भावाने बांधावर खरेदी केली. त्यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. सोशल डिस्टन्सिंगची काळजी घेऊन २८ मेपासून संचालक मंडळाने नारायणगाव, जुन्नर, ओतूर, आळेफाटा, बेल्हे उपबजार सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे टोमॅटो, फ्लॉवर, मिरची, वालवड, कोथिंबीर, मेथी आदी भाजीपाल्याच्या बाजारभावात कालपासून दुप्पट ते तिप्पट वाढ झाली आहे. 

ओतूर भाजीपाला उपबजारात काल २ हजार ३२९  डागांची आवाक झाली. नारायणगाव बाजारात मेथी, कोथिंबिरीच्या दीड लाख जुड्याची आवक झाली. कोथिंबीर, मेथीच्या जुडीला प्रतवारीनुसार शेकडा अनुक्रमे ८०० रूपये ते २६०० रुपये वाढ, १०० रूपये ते १७०० रुपये भाव मिळाला. नुकत्याच झालेल्या चक्री वादळाने फळ भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे मागील वर्षाच्या तुलनेत आवक कमी होत आहेत. 

नारायणगाव टोमॅटो उपबजारात पन्नास व्यापारी दाखल झाले असून, येथून रोज सुमारे चाळीस ट्रकमधून मुंबई, गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश भागात टोमॅटो विक्रीसाठी रवाना होत आहेत. टोमॅटोचे झालेले नुकसान पाहता बाजारभावात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकाची काळजी घ्यावी, असे आवाहन संचालक निवृत्ती काळे, सह सचिव शरद घोंगडे यांनी केले आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI: विराट कोहली अन् शुभमन गिल यांच्यात 'कड्याकाचं' भांडण? स्टार फलंदाज कर्णधाराला बोट दाखवत बडबडला Video Viral

मुंबईत विसर्जन मिरवणुकीत भरधाव कार घुसली, गणपतीच्या ट्रॉलीला धडक देत 4 जणांना उडवलं; घटनास्थळाचा VIDEO

सौंदर्य अन् बुद्धिमत्तेचा संगम! वयाच्या २३व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC क्रॅक करून बनली IFS अधिकारी, कोण आहे तमाली साहा?

Asian Games 2026 : अडखळला, पडला... पण जिद्दीने शर्यत पूर्ण करून भारताचा ४४ वर्षांचा दुष्काळ संपवला! कोण आहे सावन बरवाल?

Satara DJ Dolby Action : पोलिसांची कारवाई चुकीचीच! साताऱ्यात डीजे जप्त झाल्यानंतर उदयनराजेंनी थेट घेतली डॉल्बी चालकांची बाजू; पालकमंत्री देसाईंची भूमिका काय?

SCROLL FOR NEXT