Torture of a minor girl by breaking into the house Torture of a minor girl by breaking into the house
पुणे

पाणी हवे असे म्हणत घरात घुसला; पुण्यात मुलीवर बलात्कार

सकाळ डिजिटल टीम

पुणे : पिण्यासाठी पाणी मागण्याचे नाटक करीत एका नराधमाने घरात घुसून १७ वर्षीय मुलीवर बलात्कार (Torture) केला. ही धक्कादायक घटना पुण्यातील वाकड येथे घडली. मुलगी गरोदर राहिल्यानंतर घटना उघडकीस आली. याप्रकरणी आईच्या तक्रारीवरून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना फेब्रुवारी महिन्यात घडली होती. (Torture of a minor girl by breaking into the house)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगी फेब्रुवारी महिन्यात घरी एकटीच होती. यावेळी २८ वर्षे वयोगटातील युवकाने मुलीला पिण्यासाठी पाणी मागितले. मुलगी घरात पाण्याचा ग्लास आणण्यासाठी गेली असता युवकानेही घरात प्रवेश केला. यानंतर युवकाने ठार मारण्याची धमकी देत मुलीवर बलात्कार (Torture) केला. बलात्कारानंतर युवक घटनास्थळावरून फरार झाला. बलात्कार झाल्यानंतर भयभीत झालेल्या मुलीने कुणालाही याबद्दल सांगितले नाही.

मात्र, मुलगी गरोदर राहिल्यानंतर ही बाब उघडकीस आली. मुलगी गरोदर असल्याचे समजताच आईने विश्वासात घेऊन विचारपूस करण्यास सुरुवात केली. आईने आस्थेने विचारल्याचे बघून मुलीनेही घडलेला घटनाक्रम (Torture) सांगितला. यानंतर आईने मुलीसह वाकड पोलिस स्टेशन गाठून आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदाअंतर्गत गुन्हा दाखल (Case File) केला. आता पोलिस आरोपी युवकाचा शोध घेत आहे. या घटनेमुळे पुण्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mhada House: म्हाडाची घरे खरंच परवडणारी? मुंबईतील घरांच्या किमती एक काेटीच्या पुढे

Lightning Strike Death : साताऱ्यात अवकाळीचे तांडव! वीज अंगावर कोसळून महिला ठार; वाई-खंडाळ्यात 35 निष्पाप मुक्या जीवांचा अंत

Fuel Shortage Rumor : युद्धाच्या अफवेने 'इंधन' भडकलं! मुक्ताईनगरमध्ये 500 लिटरच्या प्लास्टिकच्या टाक्यांत भरलं जातंय पेट्रोल-डिझेल; पाहा धक्कादायक Video

Pune News: पुणे ‘आरटीओ’त लाचखोरीचा ‘कळस’; वाहननिरीक्षकाची तक्रार, पदोन्नतीला ‘ब्रेक’ची शक्यता, त्या’ बड्या धेंडांवर कारवाई होणार का?

Summer Fashion Tips: उन्हाळ्यात दिवसभर कूल, फ्रेश आणि सुपर स्टायलिश दिसायचंय? मग ‘हे’ फॅब्रिक्स नक्की ट्राय करा!

SCROLL FOR NEXT