Chandani Chauk Sakal
पुणे

Chandani Chowk : ट्वीन टॉवर जमीनदोस्त करणारी कंपनी 10 सेकंदात पाडणार पुण्यातील पूल

सकाळ डिजिटल टीम

Chandani Chowk Traffic Issue : काही दिवसांपूर्वी दिल्लीतील ट्वीन टॉवर कंट्रोल्ड एक्स्ल्पोजन सिस्टिमद्वारे अवघ्या काही मिनिटांमध्ये जमीनदोस्त करण्यात आले होते. त्यानंतर आता पुणे-मुंबई हायवेवरील चांदणी चौकात वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर आला होता. या कोंडीचा फटका खुद्द राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनादेखील बसला होता. त्यानंतर ही कोंडी तातडीने सोडवण्यासाठी युद्धपातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत.

चांदणी चौकतील ही वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी चांदणी चौकतील पूल पाडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी दिल्लीतील ट्वीन टॉवर पाडणाऱ्या Edifice engineering या कंपनीची NHAI ने निवड केली आहे. ही कंपनी दिल्लीतील ट्वीन टॉवर पाडण्यासाठी ज्या तंत्रज्ञानाचा वापर केला होता त्याचाच वापर चांदणी चौकातील पूल पाडण्यासाठी करणार असून, अवघ्या 10 सेकंदात येथील पूल जमीनदोस्त होणार आहे.

चांदणी चौकात उभारणार नवीन पूल

दरम्यान, मुंबई- बंगळुरू महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. रोज या रस्त्यावरून लाखो वाहनं प्रवास करतात. त्यात पुण्यातील चांदणी चौकात रस्ते विकसित करण्याचे काम सुरू असून, येथील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी नव्या उड्डाणपुलाच्या निर्मितीचे काम युद्धपातळीवर सुरू असून, त्यासाठी येथील जुना उड्डाण पूल पाडण्यात येणार असून, ट्वीट टॉवर पाडणाऱ्या edifice engineering कंपनीचे अधिकारी या ठिकाणी पाहणी करण्यासाठी जाणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd T20I: टीम इंडियाचे घालीन लोटांगण! इंग्लंडने ७६ धावांवर श्रेयस अय्यरच्या संघाला गुंडाळले; फलंदाज तोंड लपवताना दिसले

IND vs ENG 3rd T20I: २० चेंडूंत ५ विकेट्स! वैभव सूर्यवंशी बघा कसा OUT झाला! इंग्लंडने सापळा रचून करेक्ट कार्यक्रम केला.. Video

Argentina vs Egypt: थरार, थरार, थरार... मेस्सीची पेनल्टी हुकली तरीही अर्जेंटिनाने पिछाडीवरून मुसंडी मारली; १३ मिनिटांत मॅच फिरवली

IND vs ENG 3rd T20I: फिल सॉल्टची तुफान फटकेबाजी, इंग्लंडचे भारतासमोर तगडे लक्ष्य... प्रिंस यादव, हर्षित राणा चमकले पण...

FDA Raid : दूग्ध प्रक्रिया उद्योगावर FDAचा छापा; भेसळयुक्त दूध केले जप्त

SCROLL FOR NEXT