पुणे

टायगर पॉइंटच्या दरीत आढळला तरुणीचा मृतदेह

CD

​लोणावळा, ता. २ : येथील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या टायगर पॉइंटच्या दरीत एका २० वर्षीय तरुणीचा मृतदेह सोमवारी (ता. १) आढळून आला. श्रेया नरेंद्र पती (रा. सीबीडी बेलापूर, नवी मुंबई) असे या मृत तरुणीचे नाव असून, ती बेपत्ता असल्याची नोंद लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यामध्ये करण्यात आली होती.
लोणावळा ग्रामीण पोलिस व शिवदुर्ग रेस्क्यू टीमने अथक परिश्रमाने रात्री उशिरा सदर तरुणीचा मृतदेह दरीतून बाहेर काढला.
​मिळालेल्या माहितीनुसार, श्रेया पती ही ३१ जानेवारीच्या रात्री ८ वाजल्यापासून ते १ फेब्रुवारीच्या संध्याकाळपर्यंतच्या कालावधीत बेपत्ता होती. याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यामध्ये ‘मिसिंग’ची नोंद करण्यात आली होती. शोधकार्य सुरू असतानाच मौजे आतवन गावच्या हद्दीतील टायगर पॉइंटच्या दरीमध्ये एक मृतदेह पोलिसांना आढळून आला.
​मिसिंग रिपोर्टमधील वर्णन आणि दरीत सापडलेला मृतदेह यात साम्य आढळल्याने पोलिसांनी श्रेयाचा भाऊ निशांत पती याला तळेगाव दाभाडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाचारण केले. मृतदेह पाहिल्यानंतर निशांत यांनी ती आपली बहीण श्रेयाच असल्याचे स्पष्ट केले. ​लोणावळा ग्रामीण पोलिसांनी याप्रकरणी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १९४ अन्वये अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. ​श्रेयाचा दरीत पडून मृत्यू नेमका कसा झाला? हा घातपात आहे की अपघात? याचा तपास लोणावळा ग्रामीण पोलिस करत आहेत.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधींनी नरवणेंच्या पुस्तकाचा उल्लेख करताच सत्ताधाऱ्यांचा गोंधळ; शहा, राजनाथ सिंहसुद्धा आक्रमक

आम्ही टॉक्सिक नव्हतो पण... प्रियदर्शिनी इंदलकरने सांगितलं ब्रेकअपचं कारण; म्हणाली, 'तो वयाने मोठा असल्याने...'

Jal jeevan Yojana : जलजीवनचा 'कोरडा' थाट! बिले कंत्राटदाराच्या खिशात, पण जांभूळपाड्याच्या नळाला पाणीच नाही

Valentines Day Special Recipe: 'व्हॅलेनॉटाइन्स डे'ला तुमच्या जोडीदारासाठी बनवा खास चॉकलेट बिस्कीट केक, अगदी सोपी रेसिपी आहे!

Pune News: शेणापासून बनविलेल्या पर्यावरणपूरक कलात्मक वस्तू सातासमुद्रापार; मानसी व सायली निघोटबहिणींनी उभारला हक्काचा व्यवसाय!

SCROLL FOR NEXT