accident Sakal Media
पुणे

जुन्नर : ट्रॅक्टर अपघातात वडील-मुलाचा दुर्दैवी मृत्यू

शेती मशागत करत असताना घडला अपघात

दत्ता म्हसकर

जुन्नर : राळेगण (ता. जुन्नर) येथे ट्रॅक्टरने शेतात काम करत असताना झालेल्या अपघातात वडील व मुलाचा मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना शनिवारी (ता. १७) रोजी दुपारी घडली. या घटनेमुळे राळेगण गावावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

कल्याण जि. ठाणे येथील महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी सोपान उंडे, (वय ५६) सुट्टी घेऊन कुटुंबासह राळेगण येथे आपल्या गावी आले होते. नुकताच पाडव्याच्या दिवशी त्यांनी नवीन ट्रॅक्टर खरेदी केला होता. शनिवारी दुपारच्या वेळेस सोपान उंडे व त्यांचा मुलगा तेजस (वय २०) व घंगाळदरे येथील ट्रॅक्टर चालक संदेश तळपे यास घेऊन शेती मशागत करत होते. एका शेतात रोटर मारून झाल्यानंतर दुसऱ्या शेतात जात असताना तीव्र उभी चढण व जागेवरील वळण यामुळे चालकाचे तळपे ट्रॅक्टर वरील नियंत्रण सुटले व ट्रॅक्टर थेट वीस फूट खोल असलेल्या शेतात पडला. ट्रॅक्टरने एक पलटी मारुन पुन्हा उभा झाला. यावेळी ट्रॅक्टरचे हूड चेपले ट्रॅक्टरवर बसलेले सोपान उंडे व चालक तळपे त्यात अडकले तर मुलगा तेजस जमिनीवर पडला. गंभीर जखमी झालेल्या तळपे याने ट्रॅक्टरच्या हुडातुन सुटका करून आरडाओरडा केला. त्याच्या घंगाळदरे गावातील लोकांना फोन करुन बोलावले. घंगाळदरे व राळेगण येथील लोक मदतीसाठी पोहचले. मात्र तोपर्यत सोपान उंडे ट्रॅक्टरच्या हुडात अडकून जागीच मृत झाले होते.

तेजस व तळपे यांना उपचारार्थ दवाखान्यात नेत असताना रस्त्यातच तेजस मरण पावला. तळपे यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, ट्रॅक्टर हा छोटा असून त्याला जोडलेल्या रोटरच्या वजनामुळे ट्रक्टरचे वळणावर नियंत्रण सुटून हा अपघात झाला असावा असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पुढील तपास जुन्नर पोलीस करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Doval: आपली मंदिरे लुटली, आपण गप्प पाहत राहिलो… आता इतिहासाचा ‘बदला’ घ्यायची वेळ; अजित डोवाल यांचा थेट इशारा

Woman Police Case : रक्षकच बनले भक्षक! महिला पोलिस कॉन्स्टेबलवर 8 वर्षे सामूहिक बलात्कार; पोलिस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप

Latest Marathi News Live Update : किल्ले रायगडावर सुरु होणार लाईट अँड साऊंड शो

महाराष्ट्रात MOFA आणि RERA चे वेगळे नियम; सरकारचा बांधकाम क्षेत्राला दिलासा, नवे नियम काय?

Chhatrapati Sambhajinagar Election : महापालिकेचे चौथे इलेक्शनही पाण्यावर! महापालिकेवर वाढले कर्ज; नागरिकांवर वाढीव पाणीपट्टीचे संकट

SCROLL FOR NEXT