online exam 
पुणे

ऑनलाईन परिक्षा घेताना प्राध्यापकांचाच गोंधळ; चुका टाळण्यासाठी दिलं प्राध्यापकांना ट्रेनिंग 

ब्रिजमोहन पाटील

पुणे, ता. १३ : अंतिम वर्षाच्या परीक्षेत झालेल्या चुका पुन्हा होऊ नयेत यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि काळजी घेतली आहे. प्रश्नसंच तयार करताना ते एक्सेल शीट मध्ये कसे भरावेत, आकृती-फॉर्मुले यांची रचना कशी करावी, हा संच गोपनीय पद्धतीने कसा ऑनलाईन सबमिट करावा याचे ट्रेनिंग अभ्यास मंडळाच्या अध्यक्षांसह सदस्यांना देण्यात आलेली आहे. त्यामुळे आगामी बॅकलॉग परीक्षेत गोंधळ होणार नाही अशी आशा व्यक्त केली जात आहे. 

हेही वाचा - Diwali Festival 2020 : बांबूपासून तयार होणारे आकाशकंदील यांना मिळतीय मोठी मागणी
पुणे विद्यापीठातर्फे ऑक्टोबर महिन्यात अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा बहुपर्यायी प्रश्न (मल्टिपल चॉइस क्वेश्चन-एमसीक्यू) पद्धतीने घेण्यात आली. ही परीक्षा ऑनलाईन व ऑफलाईन माध्यमातून होणार होती मात्र 'एमसीक्यू' पद्धतीने प्रश्न कसे काढावेत, एक्सेल शीट मध्ये भरताना काय काळजी घ्यावी भाषांतर करताना फॉन्ट बदलू नये म्हणून काय काळजी घ्यावी याबाबत बहुतांशी प्राध्यापकांना व्यवस्थित माहिती नव्हती. प्राध्यापकांनी विषयानुसार प्रश्न संच तयार करून परीक्षा विभागाकडे जमा केले प्रश्नसंच गोपनीय असल्याने ते कोणत्या स्वरूपात आहेत याची माहिती परीक्षा विभागाला नव्हती. त्यामुळे परीक्षेच्या पहिल्या दिवसापासून असंख्य त्रुटी समोर आल्या ने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. विद्यापीठाच्या कारभारावर प्रचंड टीका झाल्याने संबंधित विषयांच्या अधिष्ठातांसह कुलगुरू, प्रकुलगुरू, परीक्षा संचालक यांना दिवस-रात्र प्रत्येक प्रश्न संच तपासून घ्यावा लागला. त्यानंतर शेवटच्या टप्प्यात परीक्षा कशीबशी सुरळीत पार पडली. 

अंतिम वर्षाच्या परीक्षेला नंतर डिसेंबर बॅकलॉग आणि श्रेणीसुधारसाठी ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे. त्यासाठी प्रश्न संच तयार करण्याचे काम सुरु असून या आठवड्यात पूर्ण करण्याच्या सूचना प्राध्यापकांना देण्यात आल्या आहेत. मात्र त्यापूर्वी विद्यापीठाने सर्व विषयांचे अभ्यास मंडळाचे अध्यक्ष व सदस्य यांचे विद्याशाखा निहाय ट्रेनिंग घेतले. त्यामध्ये चुका टाळण्याचासाठी प्राध्यापकांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. 
विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. मनोहर चासकर म्हणाले, अभ्यास मंडळाच्या अध्यक्षांना सदस्यांना प्रश्नसंच काढताना काय काळजी घ्यावी याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. टेम्प्लेट मध्ये माहिती कशी भरावी, आकृत्या कशा काढाव्यात याबाबत ही माहिती देण्यात आलेली आहे. त्यामुळे व्यवस्थित प्रश्नसंच तयार होतील. 

मानव विज्ञान विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. अंजली कुरणे म्हणाल्या, अंतिम वर्षाच्या परीक्षेत ज्या चुका झाल्या त्या पुन्हा होऊ नयेत यासाठी प्राध्यापकांना तांत्रिक माहितीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यानुसारच प्रश्नसंच तयार होणार असल्याने पुढील परीक्षेत अडचणी येणार नाहीत.''

सिस्टीममध्ये ही सुधारणा 
पुणे विद्यापीठाने प्रश्नसंच तयार करण्यासाठीच्या सिस्टीम मध्ये देखील सुधारणा केली आहे. प्राध्यापकांना एक्सेलमध्ये प्रश्न तयार केल्यानंतर ते ईमेल न करता थेट ऑनलाईन सिस्टीम मध्ये अपलोड करता येणार आहेत. प्रश्नसंच गोपनीय त्यामुळे त्या कोणालाही ओपन करुन बघता येणार नाहीत, पण त्यामध्ये तांत्रिक चुका येऊ नयेत यासाठी प्रत्येक अडचण सोडण्यासाठी मदत केली जाणार आहे. तसेच पूर्वीपेक्षा आता प्रश्न काढणे मध्ये सबमिट करण्याची पद्धत सोपी झाली आहे, असे व्यवस्थापन शाखेचे अधिष्ठाता डॉ. पराग काळकर यांनी सांगितले. 

- अंतिम वर्ष परीक्षेत एमसीक्यू प्रश्न काढताना झाल्या होत्या चूका 
- प्रश्न काढताना काय काळजी याच्या सूचना 
- ऑनलाइन प्रणालीचा वापर कसा करावा 
- प्रश्नसंच अपलोड केल्यावर फॉन्ट, भाषांतर, आकृती, फॉरम्युला बदलू नये यासाठी काळजी 
- एक्सेलशीटचा योग्य वापर व प्रश्न अपलोड करण्यासाठी अभ्यासमंडळाच्या सदस्यांना मार्गदर्शन
- बॅकलॉग व श्रेणीसुधारसाठी सुमारे पावणे तीन लाख विद्यार्थी परीक्षा देणार
- सुमारे अडीच हजार विषयांची परीक्षा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

SCROLL FOR NEXT