Pinaka fireball 
पुणे

डीआरडीओकडून पिनाका अस्त्रप्राणालीचे हस्तांतरण

सकाळवृत्तसेवा

पुणे - पिनाका अस्त्रप्रणालीची 'ऑथॉरिटी होल्डिंग सील्ड पर्टिक्युलर्स' (एएचएसपी) ही जबाबदारी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेकडून (डीआरडीओ) संरक्षण सामग्री गुणवत्ता संचालनालयाकडे (डीजीक्यूए) हस्तांतरित करण्यात आली आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुण्यातील शस्त्रास्त्र संशोधन आणि विकास आस्थापनेत (एआरडीई) हा कार्यक्रम पार पडला. विविध उत्पादन संस्थांना आवश्यक असणारे कागदपत्रेही यावेळी सुपूर्द करण्यात आले. पुण्यातील डीआरडीओ व एआरडीईने संरक्षण क्षेत्रातील अन्य संस्थांच्या साहाय्याने या अस्त्रप्रणालीची रचना आणि विकास केला आहे. सध्या आयुध निर्माण कारखाने, भारत इलेक्ट्रॉनिक, भारत अर्थमूव्हर, टाटा पॉवर आणि एल अँड टी डिफेन्स येथे मोठ्या प्रमाणावर पिनाका अग्निबाण आणि त्याची भूमीलगतची प्रणालीचे उत्पादन सुरु आहे.

भारतीय बनावटीच्या पिनाका अग्नीबाण शस्त्र 'मल्टी बॅरल रॉकेट लाँचर सिस्टीम' म्हणून ओळखले जाते. याची मारक क्षमता ३७.५ किलोमीटर इतकी आहे. तर पिनाका क्षेपणास्त्र जवळपास 12 रॉकेट डागण्यासाठी केवळ 44 सेकंदाचा कालावधी घेतो. याचा साह्याने उंच डोंगरावर असलेल्या शत्रूंवर हल्ला करणे शक्य आहे. 

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हा कार्यक्रम पार पडला. डीआरडीओचे अध्यक्ष डॉ.जी.सतीश रेड्डी, डिजीक्यूएचे महासंचालक ललेफ्टनंट जनरल संजय चौहान, यांच्यासह संरक्षण क्षेत्रातील अन्य महत्त्वपूर्ण संस्थांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भाग घेतला.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अ‍ॅट्रॉसिटी कायद्यावर मंत्र्यांचा यु-टर्न! संघटनांच्या संतापानंतर सरकारची माघार; थेट अटकेच्या मुद्द्यावर भूमिका बदलली

IPL 2026 मध्ये २-३ हजार धावा करायच्या आहेत! वैभव सूर्यवंशीचा आत्मविश्वास पाहून सारेच चक्रावले; म्हणाला, वैयक्तिक विक्रम...

Iran Israel War Anxiety : युद्धाची चाहूल आणि मनातली घालमेल; असुरक्षिततेच्या काळात भावनिक स्थैर्य कसे राखाल?

Gambhir on Dhoni: 'माझी इच्छा आहे की एक दिवस त्याने माझ्या जागेवर यावं आणि मी त्याला...' धोनीबद्दल काय म्हणाला गंभीर?

Latest Marathi Update : नाशिकच्या इगतपुरीत अल्पवयीन युवतीवर अत्याचार प्रकरणाने खळबळ

SCROLL FOR NEXT