The transformer explosion at Bhosari has raised questions about the work of electrical inspectors 
पुणे

''आहे ते काम करीत नाही, नवीन विद्युत निरीक्षकांची भरती कशासाठी?''

सकाळवृत्तसेवा

पुणे : भोसरी येथील विद्युत रोहित्राचा (ट्रान्सफॉर्मर) स्फोट प्रकरणावरून विद्युत निरीक्षकांच्या कामावर प्रश्‍न निर्माण झाला आहे. महावितरणकडून केलेली वीजविषयक कामे दर्जेदार होत आहे की नाही, हे पाहण्याची आणि त्यांची नियमित तपासणी करण्याची जबाबदारी या निरीक्षकांवर आहे. परंतु ती होत नसल्याचे या घटनेवरून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. असे असताना अनावश्‍यकपणे विद्युत निरीक्षकांची पदसंख्या वाढून त्यांची भरती करण्याचे काम ऊर्जा विभागाकडून सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 

पुण्यात रुग्ण फिरला तीन तास अन् उपचार पिंपरीत 

भोसरी येथील इंद्रायणीनगर मधील राजवाडा बिल्डिंग 2 जवळील ट्रान्सफॉर्मरचा स्फोट चार दिवसांपूर्वी होऊन एका महिलेसह पाच महिन्यांच्या मुलीचा मृत्यू झाला. यापूर्वी खराडी येथे अशाच प्रकारे ट्रान्सफॉर्मरचा स्फोट होऊन दोन अभियंत्यांना आपला जीव गमवावा लागला होता. वास्तविक महावितरणकडून वीजविषयक जी कामे केली जातात. ती गुणवत्तापूर्वक झाली आहे की नाही, तसेच त्या कामांची नियमित तपासणी करण्याची जबाबदारी ही ऊर्जा विद्युत निरीक्षण शाखेचे विद्युत निरीक्षक यांची असते. परंतु अनेकदा त्यांच्याकडून नियमित तपासणी केली जात नाही. त्यातून असे प्रकार घडत असल्याचे वरील प्रकारावरून स्पष्ट झाले आहे. 

भोसरी येथील स्फोटानंतर विद्युत निरीक्षक यांनी भेट देऊन तपासणी करणे अपेक्षित आहे. परंतु महावितरणकडून मिळालेल्या माहितीनुसार ही घटना घडून चार दिवस झाल्यानंतरही निरीक्षक घटनास्थळी पोचलेले नाही. विद्युत निरीक्षक यांनी तपासणी करून अहवाल दिल्यानंतर दोषींवर कारवाई होऊ शकते. तसेच नेमका ट्रान्सफॉर्मरमध्ये नेमका काय बिघाड झाला होता,हे देखील कळू शकते. परंतु विद्युत निरीक्षक घटनास्थळी भेट देऊन पाहणी करण्याएवढा वेळ नसल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे. 

शेतकरी मालामाल, टोमॅटोची दोन तासांतच साडेतीन कोटीची उलाढाल

विद्युत निरीक्षकांची खोगीर भरती सुरू 
ऊर्जा विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या विद्युत निरीक्षण शाखेत 397 विद्युत निरीक्षक आहेत. 2019 पासून राज्य सरकारने 11 किलो वॅटच्या वरील वीजभार असलेल्या कामांची तपासणी करण्याचे अधिकार विद्युत निरीक्षकांना देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सध्या असलेल्या सुमारे 75 टक्के निरीक्षकांना कोणतीही काम राहिले नाही. जवळपास तेरा वर्ष ही पदे रिक्त ठेवल्यानंतर आता ती भरण्याचे काम ऊर्जा विभागाने हाती घेतले आहे. एकीकडे जे विद्युत निरीक्षक आहे, त्यांना काम नाही, दिलेले कामे ती करीत नाही. एकीकडे आर्थिकस्थीती बिकट असल्याने सर्व खात्यांना 33 टक्केच खर्च करण्याचे बंधन राज्य सरकारने घातले असताना दुसरीकडे मात्र विनाकारण नवीन भरती कशासाठी केली जात आहे, असा उपस्थित केला जात आहे. 

उर्जा विद्युत निरीक्षण विभागात आता जे विद्युत निरीक्षक आहेत, त्यांना काम नाही. काम असेल तर ते करीत नाहीत. असे असताना नवीन विद्युत निरीक्षकांची भरती करण्याची गरज काय आणि कशासाठी ही भरती केली जात आहे. भोसरी येथील घटना घडल्यानंतर चोवीस तासाच्या आतमध्ये विद्युत निरीक्षकांनी तेथे भेट देणे बंधनकारक आहे. अनेकदा हे निरीक्षक घटनास्थळी भेट न देता बसल्या जागीच रिपोर्ट तयार करतात. 
- विवेक वेलणकर (सजग नागरीक मंच) 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Updates :दोन गट हातात कोयता घेऊन आमनेसामने; पोलिसांच्या तत्परतेने अनर्थ टळला

Nagpur News : ऑनलाइन बेटिंग रॅकेटचा पर्दाफाश; २० कोटींचे व्यवहा, छत्तीसगढ पोलिसांकडून नागपुरात सहा जणांना अटक

बाहुबली: द बिगिनिंगला 10 वर्षे पूर्ण झाली आहेत, आता बाहुबली: द एपिक रिलीज होणार 'या' तारखेला !

Success Story: पेंडकापारचा ‘आशीर्वाद’ चमकला शिकागोमध्ये; प्रतिकूल परिस्थितीवर केली मात बेला परिसरात कौतुक

Thane Rickshaw Driver Girl Video: भाडे नाकारले, हात उचलला, ठाण्यात रिक्षाचालकाची मुजोरी | Sakal News

SCROLL FOR NEXT