Transport of essential commodities should not be obstructed order by Divisional Commissioner 
पुणे

Lockdown : जीवनावश्यक वस्तुंची वाहतूक अडवू नये : विभागीय आयुक्त  

सकाळवृत्तसेवा

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या कालावधीत अन्नधान्य, भाजीपाला पुरवठा सुरळीत सुरु राहण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पासेस देण्यात येत असून, त्यांना पोलिसांनी अडवू नये, अशा सूचना विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी दिल्या.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 
कृषी उत्पन्न बाजार समिती, पुना मर्चंट चेंबर,आडते, हमाल, तोलणार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांबरोबर  विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक पार पडली. डॉ. म्हैसेकर म्हणाले, अन्नधान्य, भाजीपाला, किराणामाल याबरोबरच इतरही जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक रस्त्यात पोलिसांनी अडवू नये. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पासेस देण्यात येतील. तसेच आतापर्यंत पोलीस प्रशासनमार्फतही अत्यावश्यक सेवेतील काही ट्रक, टेम्पोचालक यांना पासेस वितरण करण्यात आले आहेत. त्यांना मालवाहतूकीस ये-जा  करण्यास कुठल्याही प्रकारची अडचण भासणार नाही, याची जिल्हा प्रशासन खबरदारी घेईल. कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांनाही पास देण्यात येतील. परंतु त्या पासचा गैरवापर होणार नाही, याची संबंधितांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. 

 Coronavirus : कोरोनासाठी पुण्यात स्वतंत्र रूग्णालय; सरकारचा प्रस्ताव
कामगारांचा विमा उतरवण्यासाठी प्रयत्न
कामगारांचा विमा उतरवण्यासाठी प्रशासनाच्या वतीने प्रयत्न केले जातील. दररोज ग्रामीण भागातून ये-जा करणाऱ्या कामगारांसाठी बसेसची व्यवस्था करण्यात येईल. त्याचबरोबर ये-जा करणे शक्य नसणाऱ्या कामगारांसाठी राहण्याची, जेवणाची व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात येणार आहे.
खासदार, आमदारांच्या ॲम्ब्युलन्स ताब्यात घ्या ! 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Auction live : मुंबई इंडियन्सची स्वस्तात मस्त डील! रोहित शर्माला तगडा ओपनिंग पार्टनर मिळाला, झाली घरवापसी; चिंता मिटली

Mumbai News: कायदा पोलिसांना लागू नाही का? उच्च न्यायालयाचा सवाल; केंद्राला भूमिका स्पष्‍ट करण्याचे आदेश

IPL 2026 Auction: वेंकटेश अय्यरची किंमत तब्बल १६.७५ कोटींनी झाली कमी! माजी विजेत्यांनी केलं खरेदी

IPL 2026 Auction live : खिशात नाही दाणा अन्... ! Mumbai Indians च्या खेळीने सारे चक्रावले; CSK च्या रणनीतीने KKR चा खिसा कापला...

Latest Marathi News Live Update : विहीरीत पडलेल्या हरणास शेतकऱ्यांनी दिले जीवदान

SCROLL FOR NEXT